नाशिकरोड : प्रतिनिधी
मागील भांडणाची कुरापत काढून नऊ ते दहा जणांच्या टोळक्याने नाशिकरोड येथील वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरावर तुफान दगडफेक करीत लाखोंचे नुकसान केले ‘यामध्ये घराच्या काचा, दुचाकी आणि चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात वृत्तपत्र विक्रेते अनिल कुलथे यांच्या पत्नी उषा कुलथे (रा. पाटील गॅरेजच्या पाठीमागे, देवळाली गाव नाशिकरोड) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी रात्री कुलथे यांच्या घरावर याच परिसरात राहणाऱ्या योगेश आव्हाड प्रिन्स लांबा किरण शिंदे व त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी मागील भांडणाची कुरापत काढून कुलथे यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. दगडफेक एवढी भयाण होतो की, खिडकीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेनंतर कुलथे यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीं वर क** कारवाई करण्यात येईल असे सांगितले याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश न्याय दे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु अद्याप याप्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
