द्राक्ष ,कांदा पिकाला फटका

निफाड तालुक्यात अवकाळी पाऊसाची जोरात बँटिंग
निफाड ।प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील निफाडसह उगांव शिवडी नांदुर्डी खडकमाळेगांव रानवड नैताळे सोनेवाडी शिवरे भागात पहाटेपासुन विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला आहे
सकाळपासुन हवेत गारवा निर्माण झाला आहे या पाऊसामुळे काढणीस आलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसणार आहे निर्यातीच्या हेतुने द्राक्षबागेत पेपर वेष्टन करुन ठेवलेल्या द्राक्षघडांत पाणी साचुन गारव्यामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका आहे त्यामुळे पेपरचे वेष्टन काढण्याची नामुष्कीदेखील द्राक्ष बागायतदारांवर आलेली आहे
पहाटेपासुन पाऊस सुरु असल्याने बहुसंख्य व्यापारी वर्गाने द्राक्षमालाची काढणी थांबविली आहे
या पाऊसामुळे शेतात सुकविण्यासाठी ठेवलेले मणी भिजले आहेत तसेच
कांदा पिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढुन कांदा पिकही धोक्यात आले आहे एकुणच द्राक्ष व कांदा उत्पादकांना या बेमोसमी पाऊसाने मेटाकुटीस आणले आहे

परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा मोठा धोका आहे ते त्वरित दिसणार नाहीत सुर्यप्रकाश पडल्यावर परिणाम दिसुन येतील या नुकसानीची तिव्रता येत्या दोन दिवसात जाणवेल असे जाणकार द्राक्ष बागायतदारांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *