पंचवटी – वार्ताहर
शहरात होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना दिंडोरी नाका परिसरात सायंकाळी पावणेसात वाजता किरण गुंजाळ (रा. पेठरोड) या युवकाची भररस्त्यात प्राणघातक शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. किरणच्या भावाचाही २०१८ मध्ये खून झाला होता. त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे.
अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या रक्तरंजित घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त गंगाधर सोनवणे, पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, रणजीत नलावडे घटनास्थळी दाखल झाले असून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.