नाशिक

नुकसानग्रस्त पाइपलाइनचे 15 दिवसांत काम करणार

लासलगाव-इगतपुरी रस्ताकाम : तहसील कार्यालयात बैठक; श्रीजी कन्स्ट्रक्शनच्या व्यवस्थापकाचे आश्वासन

सिन्नर ः प्रतिनिधी
लासलगाव ते इगतपुरी रस्त्याच्या कामामुळे मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजनेसह ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजनेच्या उद्ध्वस्त झालेल्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून, धुळवड, हिवरे व छोट्या पाइपलाइनचे काम येत्या एक-दोन दिवसात तर मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे काम 15 दिवसांत करून देण्याची ग्वाही श्रीजी कन्स्ट्रक्शनच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.
यासंदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या दालनात रस्त्याचे काम करणार्‍या श्रीजी कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक, राजाराम मुरकुटे, मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा ठाणगावचे सरपंच नामदेव शिंदे यांच्यासह पाणीपुरवठा योजना समितीच्या सदस्यांची बैठक
घेण्यात आली.
लासलगाव-इगतपुरी रस्त्याचे काम चालू असून, संबंधित ठेकेदार यांनी मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. रस्त्याचे काम करताना जेसीबी, पोकलेन या मशिनरींमुळे दीड ते दोन किमीपर्यंतच्या पाइपलाइनची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. बर्‍याच ठिकाणी पाइप तुटलेले असून, काही ठिकाणी दबले गेले आहेत. तसेच, ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेच्याही पाइपलाइनचे नुकसान झाले असून, याव्यतिरिक्त शेतकर्‍यांच्या खासगी पाइपलाइनचीही बर्‍याच प्रमाणात मोडतोड झाली आहे.
याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीकडे वारंवार संपर्क साधून तसेच पाठपुरावा करूनही पाइपलाइनची दुरुस्ती करून देण्यास ठेकेदार कंपनी टाळाटाळ करत असल्याने पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या गावांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना वारंवार निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करूनही संबंधित ठेकेदार या पाइपलाइनची दुरुस्ती करून देत नसल्याने आठ दिवसांत काम न केल्यास खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही काम सुरू होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
यासंदर्भात खासदार वाजे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. श्रीजी कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक यांनी धुळवड, हिवरे व छोट्या पाइपलाइनचे काम येत्या एक-दोन दिवसात सुरू करणार असल्याचे सांगितले. तसेच मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन दुरुस्तीसाठी 10 लाखांचे इस्टिमेट काढले असून, 15 दिवसांत काम करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, सचिव विलास सांगळे, राजाराम मुरकुटे, ठाणगावसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे, नवनाथ शिरसाट, विश्वास शिंदे, संजय पवार, समाधान गुळवे आदी उपस्थित होते.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago