नाशिक ः देवयानी सोनार
राज्यात मान्सूनची आगेकूच सुरू झाली आहे. पावसाळ्यात विजा कोसळून अनेक प्रकारच्या दुर्घटना घडतात. अंगावर वीज पडून जीवितहानी होते. दुशिंगवाडी आणि नांदगाव तालुक्यात वीज पडून दोन जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. वीज केव्हाही कोठेही कोसळू शकते. त्यामुळे आता हवामान विभागाने दामिनी ऍप तयार केले असून, हे ऍप वीज कोसळण्याची पूर्वसूचना देण्याचे काम करणार आहे. त्यामुळे जीवितहानी टळण्यास मदत होणार आहे.
शेतकरी, नागरिकांना वादळी पाऊस, विजांचा कडकडाटाचे अचूक अंदाज आधी मिळण्यासाठी दामिनी ऍप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जीवितहानी टाळण्यासाठी या ऍपचा वापर फायदेशीर ठरणार आहे. हवामान आणि हवामान विभागाचे अंदाज नेहमीच खरे ठरतात असे नाही. परंतु पुण्याच्या हवामान शास्त्र विभागाने गेल्या वर्षी हे दामिनी मोबाइल ऍप विकसित केले. ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही वीज कोसळून जीवितहानी होते. जीवितहानी टाळण्यासाठी या ऍपची जनजागृती आणि वापर वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
1
वीज पडण्याचा इशारा मिळाल्यानंतर काय करावे?
ऍपच्या माध्यमातून वीज पडण्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच खबरदारी घेणे गरजेचे आहे. या काळात खुले शेत झाडाखाली पर्वतीय भागात जवळ उभे राहू नये.धातूचे भांडे घासणे टाळावे. या काळात आंघोळ करू नये. जेथे पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी जाणे टाळावे. कोरड्या जागेवर उभे राहावे, विजेच्या खांबापासून दूर राहा. अशावेळी घरी जावे. घरी जाणे शक्य नसेल तर खुल्या जागेत कानावर हात ठेवून गुडघ्यावर बसून राहावे.
2 दामिनी ऍप कसे वापरावे?
दामिनी ऍप वापरायचे असेल तर मोबाइलमध्ये ऍप इन्स्टॉल करावे. गुगल प्ले माध्यमातून ते डाउनलोड करता येते. डाउनलोड केल्यानंतर नावनोंदणी केली जाते. त्यासाठी तुमचं नाव लोकेशन इतर माहिती भरावी लागते. ही सर्व माहिती भरल्यानंतर हे काम सुरू करते. तुमच्या लोकेशननुसार तुमच्या आजूबाजूच्या चाळीस किलोमीटरच्या परिसरात वीज पडण्याच्या शक्यतेची ऑडिओ मेसेज तसेच एसएमएसच्या माध्यमातून माहिती देते.
3 दामिनी ऍप काम कसे करते?
दामिनी ऍप वापरण्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर दामिनी माध्यमातून वेळेआधीच वीज मेघगर्जना आदींची माहिती मिळते. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेने देशातील एकूण 48 सेन्सरच्या मदतीने एक लाईटनिंग लोकेशन नेटवर्क तयार केले आहे. या नेटवर्कच्या मदतीने ऍप विकसित करण्यात आले आहे. हे ऍप आपल्या 40 किलोमीटरच्या परिसरातील वीज पडण्याच्या संभाव्य स्थानाबद्दल माहिती देते. विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेचीही माहिती देते.
वीज पडणे ही सेकंदाच्या हजाराव्या भागात वीज कोसळते. ढगातील घडामोडी या अतिशय क्लिष्ट व जटिल प्रक्रिया आहे. विजा कशा बनतात व पडतात यावर आजही जगात अभ्यास सुरू आहे. दामिनी ऍप हे सहाय्यक आहे. वीज कोणत्या अक्षांश रेखांशवर पडणार हे 15 मिनिटे आधी कळणार हा दावा भौतिकशास्त्राच्या नियमाला धरून नाही. क्लाऊड फिजिक्स व ऍटमॉस्फिरीक इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास केला आणि शास्त्रीय पद्धतीने लॉजिकल विचार केला तर अगदी स्पष्ट लक्षात येईल की, वीज पडण्याचे अचूक ठिकाण व वेळ याबाबत केले जात असलेले दावे अवैज्ञानिक आहेत.
– प्रा. किरणकुमार जोहरे, आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ
दरवर्षी ग्रामीण भागात तसेच शेतकरी व शेतात काम करणारे मजूर यांना नैसर्गिक आपत्ती व विजेच्या समस्यांना सामोरे जावे लागते, परिणामी अनेक शेतकरी व मजुरांचा यामध्ये मृत्यू देखील होतो. दामिनी ऍपमुळे आपल्या परिसरातील 20-30 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये जर वीज पडणार असेल तर त्याची सूचना आपल्याला 30 ते 40 मिनिटे अगोदरच मिळते. पूर्वसूचनेमुळे आपण सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतो. हे ऍप्लिकेशन मोठ्या प्रमाणात शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये उपयुक्त आहे.
– भूषण निकम, चेअरमन, कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नाशिक
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…
सिडको : विशेष प्रतिनिधी गेल्या आठ दिवसांपुर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जनावरांच्या चोरीचा गुन्हा…