मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर तडीपार

नाशिक : प्रतिनिधी
अजान विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छेडलेल्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मनसेचे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यावर दहा दिवसांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे. मनसेने मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. दिलीप दातीर हे फरार झाले होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांना पाथर्डी फाटा भागातील एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. पोलिसांनी कलम 188 अन्वये कारवाई केल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांनी दातीर यांना दहा दिवस तडीपार करण्यात यावे, अशी नोटीस मध्यरात्रीच बजावली. सद्या सुरू असलेल्या भोंग्याविरोधातील आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये म्हणून सातपूर पोलिसांनी दातीर यांच्याविरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांनी अजान नंतर भौगे लावुन हनुमान चालीसा वाजवणे तसेच राजकीय आंदोलने या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था बाधित होऊ शकते. त्यामुळे दिलीप दातीर यांना दि. 8 ते 18 मे अशा दहा दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग केल्यास कारवाईस पात्र राहाल, असे आदेशात म्हटले आहे.

पोलीस प्रशासन राज्य सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. एकाच गुन्ह्यासाठी दोनदा कारवाई कशी काय होऊ शकते. न्यायालयाने जामीन मंजूर केलेला असताना मध्यरात्री पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. दंडुकेशाही चालणार नाही. यासंदर्भात न्यायालयात दाद मागू.
दिलीप दातीर – मनसे शहर अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *