सासरच्या घरातील दागिन्यांवर सुनेचा डल्ला

पितळ उघडे पडल्याने सासरच्या मंडळींविरुद्धच तक्रार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक : प्रतिनिधी
सासू-सासरे घरी नसल्याची संधी साधून सुनेने घरातील रोकड तसेच अ‍ॅपल कंपनीचे घड्याळ, सोन्याचे दागिने चोरून नेले. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर सासरच्या मंडळींविरुद्धच छळाची खोटी फिर्याद करणार्‍या सुनेविरुद्ध सासू अनिता राजदेव यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी अनिता राजदेव या पती व त्यांच्या दोन मुलांसह काठे गल्ली येथे राहतात. त्यांचा ऑटोमोबाइलचा व्यवसाय आहे. फिर्यादी अनिता राजदेव यांना मणक्याचा आजार असून, सासरे राजू राजदेव यांनाही पॅरालिसिस झालेले आहे. फिर्यादीचा मुलगा मॉन्टी राजदेव यांचा विवाह महिमा हिच्याशी झाला. त्यानंतर काही कामानिमित्त फिर्यादी व त्यांचे पती हे खोलीला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. तसेच दुसरा मुलगा पवन यानेदेखील त्याच्या खोलीला कुलूप लावलेले असताना महिमा हिने तिच्याकडील डुप्लिकेट चावीने खोलीचे कुलूप उघडले.
पवन याच्या खोलीतून सोन्याचे दागिने, नेकलेस, चार बांगड्या, गळ्यातील चेन असे अंदाजे पंधरा तोळे सोने तसेच रोख रक्कम अकरा लाख रुपये, दहा हजार रुपये किमतीचे अ‍ॅपलचे घड्याळ चोरून नेले.सीसीटीव्हीमधील फुटेज महिमाला दाखविल्यानंतर तिने सदरची चोरी केल्याची कबुली दिली आणि रोख रक्कम आणि दागिने आणून देते, असे सांगून माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यावर तिला फोन केला असता आम्हालाच शिवीगाळ करत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.
आमची सून असल्याने आम्ही पोलिस स्टेशनला तक्रार दिली नव्हती. मात्र, तिने आमच्याविरोधातच छळाची तक्रार दिल्याने आम्ही न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. त्याचा राग आल्याने ती घरी आली आणि मोठा मुलगा मॉन्टी याने फिनाईल पाजले, असा आरोप करून दुसरा खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आम्ही महिमाविरुद्ध चोरीची फिर्याद दिल्याचे अनिता राजदेव यांनी सांगितले. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर सासरच्या मंडळींविरुद्धच छळाची खोटी फिर्याद करणार्‍या सुनेविरुद्ध सासू अनिता राजदेव यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी अनिता राजदेव या पती व त्यांच्या दोन मुलांसह काठे गल्ली येथे राहतात. त्यांचा ऑटोमोबाइलचा व्यवसाय आहे. फिर्यादी अनिता राजदेव यांना मणक्याचा आजार असून, सासरे राजू राजदेव यांनाही पॅरालिसिस झालेले आहे. फिर्यादीचा मुलगा मॉन्टी राजदेव यांचा विवाह महिमा हिच्याशी झाला. त्यानंतर काही कामानिमित्त फिर्यादी व त्यांचे पती हे खोलीला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. तसेच दुसरा मुलगा पवन यानेदेखील त्याच्या खोलीला कुलूप लावलेले असताना महिमा हिने तिच्याकडील डुप्लिकेट चावीने खोलीचे कुलूप उघडले.
पवन याच्या खोलीतून सोन्याचे दागिने, नेकलेस, चार बांगड्या, गळ्यातील चेन असे अंदाजे पंधरा तोळे सोने तसेच रोख रक्कम अकरा लाख रुपये, दहा हजार रुपये किमतीचे अ‍ॅपलचे घड्याळ चोरून नेले.सीसीटीव्हीमधील फुटेज महिमाला दाखविल्यानंतर तिने सदरची चोरी केल्याची कबुली दिली आणि रोख रक्कम आणि दागिने आणून देते, असे सांगून माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यावर तिला फोन केला असता आम्हालाच शिवीगाळ करत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.
आमची सून असल्याने आम्ही पोलिस स्टेशनला तक्रार दिली नव्हती. मात्र, तिने आमच्याविरोधातच छळाची तक्रार दिल्याने आम्ही न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. त्याचा राग आल्याने ती घरी आली आणि मोठा मुलगा मॉन्टी याने फिनाईल पाजले, असा आरोप करून दुसरा खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे आम्ही महिमाविरुद्ध चोरीची फिर्याद दिल्याचे अनिता राजदेव यांनी सांगितले. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Daughter-in-law’s scolding of in-laws’ jewelry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *