वनविभागाने पिंजरा लावुन बंदोबस्त करण्याची मागणी
निफाड। प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील शिवडी उगांव भागात गेल्या महिन्याभरापासुन दर एक दोन दिवसापासुन बिबट्याचे दर्शन होत आहे त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शिवडी उगांव भागातिल
भागातील नागरिकांनी केली आहे
निफाड तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्याचा संचार वाढला आहे दोन दिवसापुर्वी निफाड उगांव रोडवर एका मोटारसायकलस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता ही घटना ताजी असतांनाच मंगळवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास शिवडी माळवाडी सोनेवाडी भागात बिबट्याच्या जोडीने जोरदार डरकाळी फोडत सुमारे अर्धा तास ठाण मांडले होते स्थानिक नागरिकांनी त्वरित जागरुक होत ट्रँक्टर जीप मोटारसायकलच्या लाईटमध्ये बिबट्याचा शोध घेतला मात्र तोपर्यंत बिबट्याने दुसरीकडे धाव घेतली दरम्यान सदर बिबट्या कि वाघ याबाबत शंका उपस्थित होत आहे शरीरावर वाघासारखे पट्टे दिसुन आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे ,अरुण क्षीरसागर ,नितीन कापसे,
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय संचालक अँड रामनाथ शिंदे गोरख जेऊघाले,
अशोक शिंदे ,गोरख क्षीरसागर, ,दिलिप शिंदे ,सुदाम सानप,नानासाहेब शिंदे, रामनाथ सांगळे ,रोशन शिंदे ,दिनकर जाधव , नारायण शिंदे, जगन्नाथ जेऊघाले , मंगेश शिंदे , प्रमोद शिंदे गणेश शिंदे ,संतोष कातकाडे आदींसह स्थानिक नागरिकांनी केली आहे
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…