सटाणा प्रतिनिधी
– अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी आधीच चर्चेत असलेल्या सटाणा ग्रामिण रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ व अपुऱ्या सुविधा अभावी आदिवासी गरोदर महिलेची रस्त्यात प्रसूती झाल्याने बालकाचा मृत्यू झाला, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे,
तालुक्यातील नवी शेमळी येथील गरोदर महिला सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मंगळवार दिनांक १३ रोजी दुपारी दोन वाजेता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.रुग्णालय प्रशासना कडून उपचारसाठी टाळाटाळ करण्यात आली व तिला उपचारासाठी दुसरीकडे बाहेर पाठवण्यात आले.
या दरम्यान उपचाराभावी नवजात अर्भकाच्या मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रात्री उशिरा रुग्णालयाला टाळे ठोकत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत संताप व्यक्त केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे गरोदर माता तपासणी शिबीर सुरू असतांना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मनिषा समाधान सोनवणे ही गरोदर महिला उपचारासाठी आली असता.रुग्णालय प्रशासनाकडुन टाळाटाळ करण्यात आली.तिला दुसरीकड़े उपचारासाठी बाहेर पाठवण्यात आले. मात्र रस्त्यात तिची प्रसूती झाली. नवजात बालकासह त्याला पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले.मात्र उपचार व सुविधा अभावी या बालकाचा मृत्यू झाला.त्यामुळे नागरिकांत सांताप झाला होता.या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
यावेळी माजी आमदार संजय चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज सोनवणे,भाजपचे अनिल पाकळे, शिवसेनेचे संदीप सोनवणे,चंद्रकांत सोनवणे,निखिल खैरनार,बबलू खैरनार,सूरज खैरनार ,सोनू सोनवणे आदी सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…