दिंडोरीतील जखमी युवकाचा मृत्यू
घातपाताचा संशय
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी शहरातील गांधीनगर येथील जखमी युवकाचा नाशिक ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला . या युवकाचा खून की अपघात याचे कोडे शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या सोमवारी गांधीनगर येथील यश पारधी या 16 वर्षीय युवक बाजार पटांगणात जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या तोंडाला जबरदस्त मार लागलेला होता. त्याचबरोबर त्याच्या नाका, कानाला मार लागलेला होता. जखमी अवस्थेत दिंडोरी पोलिसांनी त्याला नाशिक रुग्णालयात दाखल केले. त्याला अजिबात बोलता आले नाही. अखेरीस काल (16) रोजी सकाळी बारा वाजता निधन झाले. दिंडोरी येथे मंगळवारी अंंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मृत्यूची घटना समजातच दिंडोरी शहरात हळहळ व्यक्त करण्यात आले.त्याचबरोबर त्याच्या मृत्यूची कारण समजले नसल्याने तर्कविर्तक सुरु झाले आहे. यश हा त्याच्या आजीकडे रहात होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आजीचा आधार गेला आहे. त्याच्या शरीरावर आढळलेल्या जखमावरुन त्याला जबरदस्त मारहाण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. . अमरधामामध्ये नातेवाईकांनी व मित्र परिवाराने घातपाताची शक्यता वर्तविली. यावेळी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी शोकसभेत पोलिस व सीआयडी तपासाची मागणी केली. यावेळी गांधी नगरातील नागरिक उपस्थित होते.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…