नाशिक

इच्छुक उमेदवारांकडून संभाव्य गट-गणात साखर पेरणी

निफाड तालुक्यात नवीन गट व गण रचनेनुसार होणार आगामी निवडणुका

निफाड : विशेष प्रतिनिधी
न्यायालयाच्या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, ग्रामीण भागात आपले राजकीय वर्चस्व अधोरेखित करणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी जोर धरू लागली आहे. नव्या गट-गण रचनेनुसार आगामी निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी गट व गणाचे मागील काही वर्षांचे आरक्षण गृहीत धरून लोकांच्या भेटीगाठींवर भर देत साखर पेरणी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीपूर्वीच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची वातावरणनिर्मिती सुरू झाल्याचे
चित्र आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनी ग्रामीण भाग ढवळून निघतो. अलीकडे तरुणांचाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे मोठा ओढा आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व सिद्ध करण्याची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक हे एक साधन तरुणांसाठी उपलब्ध आहे. निवडणुकीत आपल्याला संधी मिळाल्यास आपलाच पत्ता कसा ओपन होईल, यासाठी अनेक जण धडपडताना दिसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीन-चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांत बर्‍याच राजकीय उलथापालथी झाल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला पक्षातील ज्येष्ठ, युवा नेतृत्वाला सामोरे जावे लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद गट आणि गणांत देखील इच्छुकांची तयारी जोरात सुरू आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राजकीय वारसदारांचे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

गट-गण रचनेसाठी सूचना
जिल्ह्यातील गट व गण रचनेसाठी शासनाने सूचना जारी केली असून, नियोजन असे : प्रारूप गट-गण रचनेची अधिसूचना प्रसिद्धी- 14 जुलै 2025 पर्यंत. प्रारूप गट-गण रचनेला हरकती- 21 जुलै 2025 पर्यंत. विभागीय आयुक्तांना हरकतींचा प्रस्ताव सादर करणे- 28 जुलै 2025 पर्यंत. विभागीय आयुक्तांकडे हरकतींवर सुनावणी- 11 ऑगस्ट 2025 पर्यंत. अंतिम गट-गण रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे- 18 ऑगस्ट 2025 पर्यंत.

गट-गण निश्चित होण्याची शक्यता
साडेतीन वर्षांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला आहे. राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी राज्यपालांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना गट, गण प्रारूप रचना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी 18 ऑगस्टपर्यंत गट-गण रचना निश्चित करून राज्य निवडणूक अधिकारी यांना पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आरक्षण निश्चिती होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

21 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

22 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

22 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

22 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

22 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

22 hours ago