दीपक बडगुजर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

सिडको विशेष प्रतिनिधी : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरपीआयचे अॅड. प्रशांत जाधव यांच्यावर तीन वर्षांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. आता याप्रकरणी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी न्यायालयाने दीपक बडगुजर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे
तीन वर्षांपूर्वी सिडकोतील उपेंद्र नगर परिसरात रात्रीच्या दरम्यान झालेल्या गोळीबारात जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. तसेच दीपक बडगुजर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्याभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे.. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी बडगुजर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज बडगुजर यांच्यामार्फत वकिलांकडून दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर गुरुवारी (दि.१०) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असली तरी न्यायालयाने याबाबत न्याय निर्णय राखून ठेवला होता
याप्रकरणातील संशयित आरोपी दीपक बडगुजर यांच्यासह आकाश सूर्यतळ, श्रीकांत वाकोडे ऊर्फ बारक्या, सनी पगारे ऊर्फ टाक्या, मयूर बेद, अंकुश शेवाळे, प्रसाद शिंदे या टोळीने संगनमताने संघटितपणे कट रचून हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मोक्काअन्वये कारवाईचा प्रस्तावा पोलिस आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी यातील संशयीत आरोपी दिपक बडगुजर यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे
तडीपार करण्याचा प्रस्ताव
आरपीआय पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी बडगुजर यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मागितला होता न्यायालयाने सर्व बाजू पडताळून दीपक बडगुजर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे एन निवडणुकांमध्ये बडगुजर यांना अडकवण्याचे षडयंत्र विरोधकांकडून केले जात होते की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे विशेष म्हणजे गुरुवारी रात्री उशिरा पोलीस प्रशासनाकडून बडगुजर यांच्यावर मोक्याची कारवाई चा प्रस्ताव पोलीस आयुक्तांसमोर ठेवण्यात आला होता त्यात शुक्रवारी न्यायालयाकडून दीपक बडगुजर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने आता राजकीय विरोधामुळे गोळीबार प्रकरणात नाव घेतले जात होते की काय असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

6 hours ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

6 hours ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

6 hours ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

6 hours ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

7 hours ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

7 hours ago