महाशिवरात्रीसाठी फराळी पदार्थांना मागणी

शेंगदाणे, साबुदाणा, भगरीच्या दरात वाढ

नाशिक ः प्रतिनिधी
येत्या रविवारी (दि.15) महाशिवरात्र साजरी होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त उपवास केला जातो. उपवासासाठी लागणार्‍या पदार्थांना मागणी वाढली असून, दरही वाढले आहेत. शेंगदाणे, साबुदाणा आणि भगर, उपवासाची पिठेही महागली आहेत. त्यामुळे यंदा महाशिवरात्रीचा फराळ महागला आहे. शेंगदाणे 180 ते 220 रुपये किलो, साबुदाणा 70 ते 75 रुपये किलो आणि भगर 180 ते 190 रुपये किलो महागली आहे.
महाशिवरात्री देशभरात साजरी केली जाते. अनेकजण महाशिवरात्रीनिमित्त उपवास करतात. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा वर्षातील अत्यंत पवित्र दिवस असून, या दिवशी घरोघरी उपवासासाठी खिचडी, थालीपीठ, साबुदाणा वडा आणि इतर फराळी पदार्थ केले जातात. महाशिवरात्रीमुळे अनेक मंदिरांमध्ये, सार्वजनीक ठिकाणी साबुदाणा खिचडी प्रसाद वाटप केले जाते. त्यामुळे दरवाढीचा फटका सामाजिक संस्था आणि भाविकांना बसणार आहे.
उपवासासाठी लागणार्‍या रताळी, कवठ यांची आवक वाढली असली तरी दर चढेच आहेत. रताळी 80 रुपये किलो असून, चांगल्या प्रतीचे कवठ 20 ते 40 रुपये दराने विक्री होत आहे.
नोकरदार वर्गाकडून रेडिमेड फराळी पदार्थांच्या ऑर्डरला प्राधान्य देण्यात येत आहे. उपवासासाठी तयार पदार्थांनाही मागणी वाढल्याचे चित्र आहे. बटाटा चिवडा, केळी, बटाटा वेफर्स, राजगिरा, शेंगदाणा लाडू, चिक्की, साबुदाणा चिवडा आदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
त्याचबरोबर दूध, दही, ताक, तयार खिचडी, बटाटा जिलेबी, बासुंदी, श्रीखंड, खवा यांची ऑर्डर देण्याचे नियोजन सुरू असल्याचे चित्र आहे.उपवासाच्या पार्श्वभूमीवर केळी,
सफरचंद, चिकू, पपई, रामफळ, पेरू,
ड्रॅगनफ्रूट, शहाळे, डाळिंब आदींनाही मागणी वाढली आहे.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago