सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील शिंदेवाडी येथे पतीला विजेच्या धक्क्यातून वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नीला स्वतःचा जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी प्रसंगामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दीपक खाडे (42) हे गुरुवारी (दि.12) सकाळी सुमारे आठच्या सुमारास पिकांना पाणी देण्यासाठी शेतातील विहिरीवर गेले होते. वीजपंप सुरू करण्यासाठी ते विजेच्या पेटीजवळ गेले असता बटण दाबताच त्यांना अचानक तीव्र विजेचा धक्का बसला. त्यांच्यासोबत पत्नी छाया खाडे (38) उपस्थित होत्या. पतीला विजेचा धक्का बसल्याचे पाहताच छाया यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना जोराचा धक्का देत बाजूला ढकलले. त्यामुळे दीपक खाडे दूर फेकले गेले व मोठ्या संकटातून बचावले; मात्र पतीचा जीव वाचविताना छाया खाडे स्वतःच विजेच्या धक्क्याच्या विळख्यात सापडल्या.
गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पतीचा जीव वाचविताना स्वतःचे आयुष्य अर्पण करणार्या छाया खाडे यांच्या त्यागाने गाव हळहळले आहे.
Wife tragically dies while saving her husband
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik