नाशिक

देशात लोकशाही धोक्यात

 

 

 

बीबीसी कार्यालयावरील छाप्यावरून खा. संजय राऊंतांची टीका

 

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

सरकारला प्रश्न विचारल्यावर त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात. बीबीसीच्या कार्यालयावर छापेमारी झाल्यानंतर  देशात लोकशाही संकटात असल्याची टीका खा. संजय राऊत यांनी केंद्रावर केली.

 

 

नाशिक मध्ये खा. संजय आले असता त्यांनी खास  त्यांच्या शैलीत चौफेर टीका केली. पुढे तें म्हणाले सरकार विरोधात कोणी बोललं तर  तिथे अशा प्रकारच्या धाडीत पडल्या जातात किंवा अटक केली जाते. याचं मी उदाहरण आहे. देशांमध्ये अशा प्रकारचे वर्तन वृत्तपत्रांच्या बाबतीत फार कधी घडल्याचं स्मरणार नाही, आणीबाणी मध्ये वृत्तपत्रांमध्ये सेन्सॉरशिप लावली. आता यांच सरकार आल्यावर न्यायपालिका आणि वृत्तपत्र यांचं गळा घोटण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न विचारला की तेव्हा राहुल गांधींना नोटीस देण्यात आली बीबीसीने काही विषयावरती डॉक्युमेंटरी केली त्यांच्या कार्यालयावरती छापेमारी करण्यात आले आहे देशांमध्ये लोकशाही आहे तुम्ही उत्तर द्या तुमचं ही ऐकले जाईल. अदानी ने सर्व माध्यम आपल्याकडे विकत घेतली आहेत तुम्ही आमचे गळे दाबून आम्हाला तुरुंगात दाबून कोणत्या स्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहात. पंडित नेहरू पासून राजीव गांधी पर्यंत मनमोहन सिंगांपर्यंत कोणत्याही राजवटीमध्ये या देशात अशा प्रकारचं वृत्तपत्रांच्या बाबतीत आवृत्ती कृत घडल्याचं ऐकिवात नाही त्यामुळे आपल्या लोकशाही संदर्भात जगामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोटनिवडणुकांच्या निवडणुकीसाठी थेट अमित शहा निवडणूक प्रचारासाठी येत आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव आहे. विधान परिषद निवडणुकांमध्ये एखादी जागा वगळता सर्व जागा या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. हजारो शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी त्यांचा कौल आणि कल स्पष्ट आहे. या निवडणुकांमध्ये 50 एक लाखांपर्यंत मतदान होते.त्या मुळे लक्षात येते की या लोकांनी भाजप पक्षाला नाकारले आहे.  तोच निकाल कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास व्यक्त केला. उद्धव ठाकरे बोहरी समाजाची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दिवशी आले होते. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण होते. मात्र त्या दिवशी ते जाऊ शकले नाही मात्र आज ते आवर्जून बोहरी समाजाला भेटण्यासाठी गेले. बाळासाहेब ठाकरे आणि बोहरी समाज यांचे कनिष्ठ संबंध होते.

 

 

 

 

 

 

विरोधक काही म्हणू दे,  न्यायपालिकेव विश्वास 

 

 

 

सुप्रीम सुनावणीवर संजय राऊत म्हणाले की, उद्या काय होते ते बघूया मात्र आज ज्या पद्धतीने काही मंत्र्यांनी सांगितलं की काही झालं तरी निकाल आमच्या बाजूने लागेल. त्याचबरोबर नारायण राणे यांनी देखील ब्रेकिंग न्यूज दिली की चिन्ह हे शिंदे यांना मिळणार,  काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आपल्या बाजूने लागेल. याचा अर्थ असा आहे की न्यायपालिका माझ्या खिशात आहे. पण आम्ही इतकेच सांगू की न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे.

 

.

आसामवर आपल्या मुख्यमंत्र्यांचे प्रेम

 

 

आसामच्या संदर्भात आपल्या मुख्यमंत्र्यांचे अतिव प्रेम आहे. भीमाशंकर हे आसाम मध्ये असल्याचं एका नेत्याने म्हटलं आहे. कामाख्या देवी वगैरे आसामच्या मुख्यमंत्र्यांवर आमचे मुख्यमंत्री काय बोलतात हे पहावे लागणार आहे.  हा एक पोर्कटपणा चालला असून गुजरात आपल्या उद्योगांवर आक्रमण करत आहे. आता आसामचे मुख्यमंत्री आमच्या देवधर्मांवर आक्रमण करू लागल्याची टीका त्यांनी केली.

 

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago