नाशिक

लोक अदालतीत 148 दावे निकाली

 

 

 

नाशिकरोड : प्रतिनिधी

 

 

नाशिकरोड न्यायालयात शनिवारी (दि. 11) पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व वर्गवारीतील ठेवण्यात आलेल्या 10,220 प्रकरणांपैकी 148 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात यंत्रणेला यश मिळाले. निकाली निघालेल्या दाव्यांतुन 4 कोटी 18 लाख 62 हजार 902 रुपये इतका महसूल वसूल झाला आहे.

 

नाशिकरोड दिवाणी व फौजदारी तसेच मोटार वाहन न्यायालय, विधी प्राधिकरण नाशिक, नाशिकरोड वकील संघातर्फे नाशिकरोड न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात पॅनल क्रमांक 1 मध्ये न्या. एस.एस. देशमुख, पॅनल मेंबर के.एस कातकाडे, पॅनल क्रमांक 2 मध्ये कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्या.ए.एस डागा, माजी न्यायाधीश एस.आर, मालपाणी, पॅनल मेंबर अ‍ॅड. प्रतिक पवार, तसेच मोटार वाहन न्यायालयात न्यायाधीश डी.डी. कर्वे आणि अ‍ॅड. निकिता जोशी यांनी कामकाज पाहिले. यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयात एकूण 10,220 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 148 प्रकरणे निकाली निघून 4 कोटी 18 लाख 62 हजार 902 रुपये इतका महसूल प्राप्त झाला. तर मोटार वाहन न्यायालयातील 318 प्रकरणे निकाली निघून 13 लाख 11 हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला.

 

या राष्ट्रीय लोक अदालतीच्या काम काजासाठी नाशिकरोड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड, अ‍ॅड. बी.बी.आरणे,  अ‍ॅड. अविनाश भोसले, अ‍ॅड.उमेश साठे, अ‍ॅड. दीपक ताजनपुरे, अ‍ॅड.अंकुश निकम, अ‍ॅड.विलास ताजनपुरे, अ‍ॅड.विश्वास चौगुले, अ‍ॅड. गणेश मानकर, अ‍ॅड. राजेंद्र लोणे, अ‍ॅड. आत्माराम वालझडे, अ‍ॅड. योगेश लकारिया, अ‍ॅड. प्रिया बावीस्कर, अ‍ॅड. कुलदीप यादव, अ‍ॅड. एकता आहुजा, अ‍ॅड. ब्रिजेश रामराजे, अ‍ॅड. रमेश रसाळ, सहाय्यक अधीक्षक ए.एन. बागुल, मनोज मंडाले व इतर कर्मचारी तसेच सर्व सदस्यांचे न्याय यंत्रणेला सहकार्य लाभले.

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago