नाशिक

शहरात डेंग्यूचा पुन्हा शिरकाव; आठ रुग्ण बाधित

मनपा देणार बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा

नाशिक : प्रतिनिधी
दोन आठवड्यांत एकही डेंग्यू रुग्ण आढळून न आल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, तिसर्‍या आठवड्यांत डेंग्यूचा शिरकाव झाला असून, सात दिवसांत आठ रुग्ण बाधित झाल्याने मलेरिया विभाग सतर्क झाला आहे. याप्रकरणी मलेरिया विभागाने खबरदारी घेत बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचणार नाही, याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष केल्यास व्यावसायिकांना नोटिसा धाडल्या जाणार आहेत.
जानेवारी ते मेपर्यंत डेंग्यू रुग्णसंख्या 113 वर आहे. परंतु यंदा गेल्या वर्षीपेक्षा रुग्णवाढीचा वेग कमी असल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. गतवर्षी तब्बल बाराशेहून डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली होती. नागरिकांकडून याविरोधात आंदोलने केली गेली होती. मात्र, यंदा डेंग्यू नियंत्रणाबाबत वेळीच उपयोजना केल्याचा फायदा आरोग्य विभागाला होताना दिसतो. म्हणूनच यंदा सव्वाशेपर्यर्ंत रुग्णसंख्या अडकली आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. डेंग्यू डासाची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी फ्रिज, कूलरमध्ये पाणी साचवू देऊ नये. घरात किंवा आजूबाजूला पाण्याचे डबके साचणार नाही त्याची काळजी घ्यावी. याविषयी नागरिकांना माहिती दिली जात आहे. रहिवासी परिसर, अपार्टमेंट, घरातील गच्चीवर अडगळीला पडलेल्या वस्तूंंमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होण्याची शक्यता असल्याने याची पथक पाहणी करत नोटिसाही दिल्या जात आहेत.

अवकाळी पावसामुळे डासांची संख्या कमी

मे महिन्यात पहिल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने शहरात हजेरी लावली.

त्यानंतर पावसाने वेळोवेळी शहराला झोडपून काढले.

यामुळे गेल्या काही दिवसांत वाढलेल्या डासांचा प्रादुर्भाव झपाट्यात कमी झाल्याचे चित्र आहे.

बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा धाडणार

नागरिकांनी घरात पाणी साचू देऊ नये.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचणार नाही

याची काळजी घ्यावयाची आहे. याकडे संबंधितांनी

जर लक्ष दिले नाही तर नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

-डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख

Gavkari Admin

Recent Posts

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

17 hours ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

17 hours ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

18 hours ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

20 hours ago

शहरात दिवसभरात 14.2 मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…

20 hours ago

फायदेशीर करार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…

20 hours ago