देवगाव, सामुंडी परिसरातील वाडी-वस्त्या तहानेने व्याकूळ
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींतर्गत वाड्या-वस्त्यांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्या उद्भवांचा साठा अल्प प्रमाणात राहिल्याने त्र्यंबक-इगतपुरीचे उपविभागीय अधिकार्यांनी टंचाईग्रस्त क्षेत्र घोषित केले आहे, तरीही टँकर पोहोचले नसल्याने या वाड्यावस्त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत.
सामुंडी ग्रामपंचायतींंतर्गत सामुंडी, कातकरी वस्ती, खाडे वस्ती, भागओहळ ग्रामपंचायतींतर्गत भागओहळ, फणसपाडा, बाभूळपाडा आणि देवगाव ग्रामपंचायतींंतर्गत श्रीघाट, रायपाडा, मेट येल्याची, पाराचा आंबा, ढोलेवाडी, निमोणवाडी यांचा समावेश आहे. उपविभागीय अधिकारी ओमकार पवार यांनी 6 मे रोजी त्र्यंबक तहसीलदार, पंचायत समिती गट विकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांच्या सादर अहवालाच्या आधारे टंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ग्रामपंचायतींनी तसेच पंचायत समितीने महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 चे कलम 21 ते 26 ची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी. गावातील प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा स्रोतापासून 1000 मीटरपर्यंत यापैकी जे अधिक असेल, अशा क्षेत्रातील विहिरी तात्पुरत्या बंद करून पाणी उपश्यावर निर्बंधाचे आदेश पारित केले. त्याची कितपत अंमलबजावणी झाली हे समजू शकले नाही. मात्र या गाव वस्त्यांना संबंधित शासन यंत्रणेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत शिफारस केलेली असताना दोन आठवडे झाले तरीदेखील देवगाव, सामुंडी येथील वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पोहचलेले नाही. ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी भरतात. त्यात अवकाळी पाऊस येत असल्याने पाणवठ्यावर सर्वत्र गाळ साचलेला आहे. पाणी गढूळ झाले आहे. ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. मात्र, शासन यंत्रणा लक्ष देत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीपैकी ढोलेवाडी, पाराचा आंबा येथे पाणीटंचाई निर्माण असून, तत्काळ टँकर मंजूर करावा, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली होती. त्यानंतर सात मे रोजी टँकर मंजूर करण्यात आला. मात्र एक आठवडा होऊही अद्याप टँकर पोहोचला नाही. महिलांना वैतरणा धरणाच्या कडेला जाऊन जमिनीत खड्डे खोदून पाणी आणावे लागते. परिसरात एक कोटी 93 लाखांची जलजीवन योजना राबविले आहे.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील ग्रामीण जनतेला पाणी मिळत नाही.
अवकाळी पावसाने तर अधिकच दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
– भगवान मधे, एल्गार कष्टकरी संघटना
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…