वन विभागाकडे शेतकर्यांची बंदोबस्ताची मागणी
देवळा ः प्रतिनिधी
शेरी (ता. देवळा) येथे पेरणी केलेल्या मका बियाण्याची रानडुकरांकडून नासधूस होत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या मका बियाण्याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर, शेरीचे उपसरपंच नंदू जाधव, आनंदा पवार, गंगाधर पवार यांनी देवळा तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधारेनंतर खर्डे परिसरात बहुतांश शेतकर्यांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरणीला सुरुवात केली. यात मक्याची पेरणी जास्त प्रमाणात दिसत आहे. शेरी येथील शेतकरी आनंदा पवार यांनीही मक्याची पेरणी केली. शेतात रानडुकरांकडून नासाडी करण्यात आल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. परिसरात रानडुकरांचा मुक्त संचार वाढला असून, पेरणी केलेले बियाणे शेतातून उकरून काढत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वन विभागाने याची दखल घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या मका बियाण्याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खर्डेसह शेरी, वार्शी, कनकापूर, हनुमंतपाडा, मुलूखवाडी येथील शेतकर्यांनी केली आहे.
पेरणीयुक्त पाऊस झाल्यामुळे मक्याचे महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केली. याबरोबर रासायनिक खतदेखील वापरले आहे. बियाणे शेतात उगवले कीनाही ते पाहण्यासाठी गेल्यावर या ठिकाणी पेरलेले बियाणे रानडुकरांनी उकरून काढल्याने नुकसान झाले आहे.
– आनंदा पवार, मका उत्पादक शेतकरी, शेरी (ता. देवळा)
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…