नाशिक

पेरणी केलेल्या मका बियाण्याची रानडुकरांकडून नासाडी

वन विभागाकडे शेतकर्‍यांची बंदोबस्ताची मागणी

देवळा ः प्रतिनिधी
शेरी (ता. देवळा) येथे पेरणी केलेल्या मका बियाण्याची रानडुकरांकडून नासधूस होत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या मका बियाण्याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर, शेरीचे उपसरपंच नंदू जाधव, आनंदा पवार, गंगाधर पवार यांनी देवळा तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधारेनंतर खर्डे परिसरात बहुतांश शेतकर्‍यांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरणीला सुरुवात केली. यात मक्याची पेरणी जास्त प्रमाणात दिसत आहे. शेरी येथील शेतकरी आनंदा पवार यांनीही मक्याची पेरणी केली. शेतात रानडुकरांकडून नासाडी करण्यात आल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. परिसरात रानडुकरांचा मुक्त संचार वाढला असून, पेरणी केलेले बियाणे शेतातून उकरून काढत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. वन विभागाने याची दखल घेऊन या रानडुकरांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या मका बियाण्याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खर्डेसह शेरी, वार्शी, कनकापूर, हनुमंतपाडा, मुलूखवाडी येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

पेरणीयुक्त पाऊस झाल्यामुळे मक्याचे महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केली. याबरोबर रासायनिक खतदेखील वापरले आहे. बियाणे शेतात उगवले कीनाही ते पाहण्यासाठी गेल्यावर या ठिकाणी पेरलेले बियाणे रानडुकरांनी उकरून काढल्याने नुकसान झाले आहे.
– आनंदा पवार, मका उत्पादक शेतकरी, शेरी (ता. देवळा)

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago