नाशिकरोडला महिलेचा मृतदेह आढळला

प्रथमदर्शनी खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज
नाशिकरोड : प्रतिनिधी
येथील गोरे मळ्यात एका वीस ते बावीस वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या गळ्यात ओढणीचा फास अडकविलेला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा खूनाचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात सद्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास सोमनाथ जाधव यांनी पोलिसांना याबाबतची खबर दिली.शास्त्रीनगर, गोरेवाडी भागात शेतीच्या कामासाठी मजूर गेले असता त्यांना संभाजीनगरकडून एकलहरा रोडकडे जाणार्‍या कॅनाललगत 20 ते 22 वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या गळ्यात ओढणीच्या सहाय्याने गाठ मारलेली आढळून आली. या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *