महाराष्ट्र

गुलमोहोराचे झाड पडल्याने एकाचा मृत्यू

सिडको : वार्ताहर
    लेखानगर येथे दुचाकीवर गुलमोहरचे झाड पडल्याने दुचाकीवर मागे बसलेले अतुल गांगुर्डे (वय ३५) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. लेखानगर येथून बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकी जात असतांना गुलमोहोराचे झाड दुचाकीवर पडल्याने यात दुचाकीवर मागे बसलेले अतुल गांगुर्डे (वय ३५ ) रा. एकलहरा कॉलनी) यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. घटना घडल्या नंतर घटनेची माहिती युवा सेनेचे विस्तारक व विल्होळीचे सरपंच अंजिक्य चुंभळे, माजी नगरसेवक प्रविण तिदमे, भाजपा सिडको उपाध्यक्ष राहुल गणोरे यांनी घटनेची माहिती पोलिस व अग्नीशामक दलाला दिली. घटनास्थळी अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक शेख व सिडको अग्नीशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतुक सुरळीत केली.
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago