नाशिकमध्ये धनगर समाज विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिले वसतिगृह
आमदार प्रा. देवयांनी फरांदे यांचा पुढाकार, गोपीचंद पडळकर यांचे सहकार्य
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अतुल सावेंचे महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन फोरमतर्फे विजय हाके यांनी मानले आभार
नाशिक: प्रतिनिधी
येथे धनगर समाजातील १०० मुले आणि १०० मुलींसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह होत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ४५ कोटी ५२ लाखांना मान्यता दिली. त्याबद्दल मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री श्री. अतुल सावे यांचे विधीमंडळाच्या नागपूरमधील अधिवेशनामध्ये महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन फोरमतर्फे आभार मानण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील पहिल्या वसतिगृहासाठी नाशिकच्या भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेतले. आमदार गोपीचंद पडळकर यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती फोरमचे विजय हाके यांनी दिली. श्री. हाके यांचे त्यासंबंधी नियोजन आणि समन्वय आहे. तसेच धनंजय माने, बापू शिंदे, खंडेराव पाटील, किरण थोरात यांचा सहभाग राहिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे आभार मानताना प्रा. फरांदे यांच्यासह . हाके, . माने, शिंदे, . पाटील, . थोरात हे उपस्थित होते.
श्री. हाके यांनी दिलेली नाशिकमधील वसतिगृहाविषयी माहिती दिली. श्री. हाके यांनी सांगितले, राज्यात धनगर समाज मोठ्याप्रमाणात आहे. जंगलात मेंढपाळ भटकत असल्याने त्यांचे आपल्या मुले-मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या निवासी शिक्षणाची व्यवस्था मागील ७५ वर्षात झाली नाही. मात्र आताच्या महाराष्ट्र शासनाने ७५ वर्षात जे घडले नाही असे पुढील १०० वर्षे स्मरणात राहील असे काम केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री . शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, मंत्री श्री. सावे यांचे फोरमतर्फे पत्र देऊन आभार मानण्यात आले. घोंगडे आणि अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो त्यांना भेट देण्यात आला आहे.
नाशिकमधील वसतिगृह असे असणार
नाशिकमधील पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय या विभागाच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेपैकी १.१० एकर अर्थात पाच हजार चौ. मी. जागा (गट क्र. ७३७१, जुना गट क्र. १०५६-१०५७-१) इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नावाने हस्तांतरीत करण्यात आली आहे. वसतिगृह बांधकामाला ३० ऑगस्ट २०२३ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या जागेत तळमजला अधिक सहा मजले एवढे इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामध्ये १०० मुली आणि १०० मुलींच्या वसतिगृहाची सोय करण्यात येणार आहे. ५० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, १०० विद्यार्थी क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, ५० अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिम, मिटींग हाॅल हेही काम केले जाणार आहे, अशी माहिती विजय हाके यांनी दिली
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…
नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…
नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…