विल्होळी प्राथमिक शाळेत टवाळखोरांचा धुडगूस 

सिडको :वार्ताहर
विल्होळी गावातील शालेय आवारात मद्यपींनी धिंगाणा घालत परिसरातील वस्तूंची दररोज तोडफोड केली जात आहे. काल शाळेची खिडकी फोडून वर्गातील एलसीडी फोडला. एलसीडी फोडल्याबाबत तालुका पोलीस स्थानकात तक्रार करावयास गेलेल्या शालेय समिती सदस्यांना पोलिसांनी हाकलून लावल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त होत आहे.

   विल्होळी गावाचा झपाट्याने विकास होत असला तरी या परिसरातील बेकायदेशीर  धंद्याचा देखील प्रसार होताना दिसतोय ,गावातील मद्यपींवर जणू काही पोलिसांचा वरदहस्त आहे कि काय या प्रमाणे खुले आम दारुड्यांचे टोळके दिसून येतात आता तर विद्येच्या मंदिर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत नेहमीच ओल्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत ,यास विरोध करावयास गेलेल्या ग्रामस्थांना नेहमी धक्का बुकी सारखे प्रकार घडू लागले आहेत , या गोष्टी आला बसावा यासाठी तक्रार दारासच पोलीस अपराध्याची वागणूक देत असल्याने गावातील मंडळी गप मुक्याचा मार सहन करत आहे , याबाबत तक्रार देण्यास गेलेल्या शालेय समिती सदस्यना तालुका पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांनी चक्क तीन तास बाहेर ताटकळत ठेवल्याने  व  आम्हाला इतरही कामे असल्याचे सांगण्यात आल्यानें संतप्त नागरिकांनी  पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा पवित्रा घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *