फाल्गुन हा शालिवाहन शके महिन्यातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणार्या महिन्यातील शेवटचा सण असतो. होळी पेटवून दुसर्या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी जमिनीला, मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणिमात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणार्या या तत्त्वांना आपल्या सणांमधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर 15 दिवसांनी नववर्षाला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे.
या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची पातेले, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालतात. असे मानले जाते की, या पाण्याने आंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कैर्याही मिळू लागतात. कैर्या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात, अंगाला फासतात व नंतर स्नान करतात. काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुसर्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात; परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे. वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे या सुमारास झाडे नवीन पालवीने व विविधरंगी फुलांनी रंगीबेरंगी दिसत असतात. हवाही उष्ण झालेली असते. अशावेळी थंड पाणी अंगावर उडविणे सुखदायक असते. त्यामुळे रंगपंचमी हा सण सुरू झाला.
कुसुंबीच्या फुलांपासून काढलेल्या रंगाचे पाणी करून तसेच केशराचे पाणी करून ते एकमेकांच्या अंगावर उडविले जात असे. पेशवाईत तर हा सण शाही इतमामाने साजरा केला जात असे. रंगाच्या पिचकार्या भरभरून हत्तीवरून गुलाल आणि इतर कोरड्या रंगाची उधळण केली जात असे. आजकाल विविध प्रकारचे रंग पाण्यात कालवून ते एकमेकांवर उडवतात. विशेषत: तरुण स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टामस्करी करण्याची संधी या सणामुळे मिळते; परंतु कालांतराने अश्लील शब्द उच्चारून शंखध्वनी करणे यासारख्या विकृत गोष्टीही या उत्सवात शिरल्या. आजकाल एखाद्या हौदातील पाण्यात रंग टाकून एकमेकांना त्यात डुबवून हसतखेळत या सणाची मजा लुटली जाते.
धूलिवंदन (धुळवड) हा होळीच्या दुसर्या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेला साजरा केला जाणारा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी होळीची राख आणि माती अंगाला लावून पृथ्वीला वंदन करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात या दिवशी एकमेकांवर रंगपाणी आणि चिखल उडवून वसंत ऋतूचे स्वागत केले जाते. परस्परांतील मतभेद विसरून हा सण साजरा केला जातो. होळी पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेस सकाळी धुळवड साजरी करतात. पहिल्या दिवशी पेटवलेल्या होळीच्या पवित्र राखेला वंदन करून ती अंगाला लावतात, ज्याला धूलिवंदन म्हणतात.
काही ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात चिखल उडवून धुळवड खेळली जाते. हा सण रंगप्रेम आणि वसंत ऋतूचे प्रतीक असून, समाजातील बंध म्हणजेच सामाजिक एकता मजबूत करतो.
Dhulwad Lokotsav is a symbol of social unity
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…