नऊ दिवसांत 14 बेपत्ता महिला-मुलींचा शोध, नातेवाइकांच्या ताब्यात
दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी पोलीस ठाण्याने राबवलेल्या ऑपरेशन ‘शोध-3’ मोहिमेत अवघ्या नऊ दिवसांत 14 बेपत्ता महिला व मुलींचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. या महिलांना शोधून त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशानुसार तसेच कळवण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 2015 पासून बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. सपोनि सोपान राखोंडे, हवालदार विश्वनाथ काकड, हवालदार सोनाली कराड व शिपाई प्रकाश गायकवाड यांच्या पथकाने 6 मार्च 2026 पासून शोधमोहीम सुरू करून एकूण 26 बेपत्ता महिलांपैकी 14 महिलांचा शोध लावला. यामध्ये 2020 मधील एक, 2021 मधील एक, 2023 मधील तीन, 2024 मधील तीन, 2025 मधील चार आणि 2026 मधील दोन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 2020 पासून सुमारे सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचाही शोध लावण्यात यश आले.
अवैध व्यवसायांवरही कारवाई
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत अवैधधंद्यांवर कारवाई सुरू केली असून, शाळा-कॉलेज व बसस्थानक परिसरात टवाळखोरांवर कारवाई करत गस्त वाढवली आहे. तसेच लॉजचालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरात बेशिस्त वाहन पार्किंगवरही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिंडोरी पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
Dindori Police succeeds in Operation ‘Shodh-3’
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…