दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे दिंडोरी शहराची दुरवस्था झाली आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने संपूर्ण शहर जलमय झाले असून, व्यापारी, नागरिक आणि वाहनधारकांची तारांबळ उडाली. पावसाच्या प्रचंड तीव्रतेमुळे नाशिक-दिंडोरी-वणी या प्रमुख महामार्गावर पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, रस्त्यावरील पाणी थेट मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरले. शहरातील पंजाब नॅशनल बँक आणि लगतच्या ग्राहक सेवा केंद्रात पाणी शिरल्याने बँक व केंद्रातील महत्त्वाचे कागदपत्रे भिजून खराब झाले. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू व साहित्याचेही आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी मुसळधार पावसातही शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा निचरा केला आणि अनर्थ टाळला.
शहरातील धामण नदीला रौद्ररूप प्राप्त झाले. पाणी पातळी क्षणार्धात वाढल्याने गावातील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. तसेच पालखेड बंधारा रस्त्यावरील पुलावरूनही पुराचे पाणी वाहू लागल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करून दुसर्‍या मार्गाने वळवण्यात आली.
निळवंडी रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली. धामण नदीला आलेला पूर आणि पुलावरून वाहणार्‍या पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहण्यासाठी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी नदीकाठी गर्दी केली होती. अनेक जण जिवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो व व्हिडिओ काढताना दिसले.
दरम्यान, तीन तासांनंतर पावसाने विश्रांती घेतल्यावर पाण्याचा निचरा झाला; मात्र मुख्य बाजारपेठेत सर्वत्र घाण व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे व्यापारी व ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी तीव्र मागणी होत आहे.

 

Dindori town inundated

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

33 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

36 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

50 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

54 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

58 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago