दिंडोरीचे प्रांत तब्बल 40 लाखांची लाच घेताना जाळ्यात
नाशिक: जिल्ह्यात लाचखोरी कमी होण्याचं नाव घेण्यास तयार नाही, आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला मोठा मासा लागला असून, दिंडोरी येथील प्रांत नीलेश अपार यांना तब्बल 40 लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले,
लखमापूर येथील एका कंपनीच्या मालकाकडे जागा कायम करण्यासाठी प्रांत अपार यांनी 40 लाखांच्या लाचेची मागणी केली होती, याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती, त्यानुसार सापळा लावण्यात आला होता, कार्यालयातच लाच घेताना अपार यांना पथकाने पकडले, गेल्या काही दिवसातील ही आणखी एक मोठी कारवाई आहे,
यापूर्वी जिल्हा उपनिबांधक सतीश खरे, मनपा शिक्षण अधिकारी सुनीता धनगर, आरोग्य विभागातील हिवताप अधिकारी यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते, आता प्रांत च जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…
View Comments
👍