शहराच्या मुख्य प्रवेशमार्गांवर गेल्या दोन तिन दिवसांपासून अनेक लहान मोठ्या दिंड्या दाखल होत आहे.गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या संत निवृत्तीनाथ ांच्या पौषवारीला वारकर्यांची उत्स्ङ्गुर्त हजेरी असते.कोरोनामुळे वारीला ब्रेक लागला होता.यंदा वारीसाठी वारकर्यांचा उत्साह शिगेला पोहचला असून शहरात ठिकठिकाणी पालकींचे स्वागत केले जात आहे.पालखी,यात्रा मार्गावर अनेकांनी वारकर्यांना नाष्टा,जेवण,पाणी विसाव्याची सोय करून खारीचा वाटा उचलला आहे.
हेही वाचा:निमा सरचिटणीस पदी राजेंद्र अहिरे
त्रंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून शहरात टाळमृदंगाच्या गजरात अनेक दिंड्यांचे आगमन होत आहे.शहर आणि उपनगरातील त्रंबकवारीचे रस्ते वारकर्यांनी गजबजले असून हरिनामाचा जयघोष दुमदुमत आहे.रस्त्याने महिला पुरूष वारकरी हाता टाळ,मृदंग,झेंडा,तुळशीवृंदवन हाती धरून मार्गस्थ होत आहे.
राज्यातील अनेक भागांमधुन मानाच्या पालख्यांसह अनेक छोट्या मोठ्या पालख्यांचे आगमन होत आहे.शेगावची गजानन महाराजांची पालखी,जळगावहून मुक्ताबाईंची पालखी,आळंदीहून ज्ञानोबा रायांची पालखी आदी मुख्य पालख्यांसह चारशे ते साडेचारशे दिंड्यांचे आगमन झाले असून पाचशे दिंड्यांचा अंदाज आणि तीन लाखांहून अधिक वारकरी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा :संत निवृत्तीनाथांच्या पौषवारी साठी प्रशासनाची तयारी
वारकर्यांच्या सोयीसाठी अनेक दानशुरांनी हात पुढे करीत पाणी,जेवण आणि इतर सुविधा करून दिल्या जात आहे.दि.20 शुक्रवारपर्यंत संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा होणार आहे.या यात्रेसाठी जिल्ह्यासह राज्यभरातून दिंड्या दाखल होत आहेत.लाखोंच्या वर वारकरी येणार असल्याने प्रशासनाने सज्जता केली आहे.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…