नाशिक

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी
गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळेे धरणातून गुरुवारी (दि. 3) विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुरुवारी गंगापूर धरणातून 1,584 क्यूसेकने विसर्ग वाढविण्यात आला. एकूण 3,716 क्यूसेकने विसर्ग वाढला आहे. विसर्ग वाढल्याने गोदाकाठावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, जूनमध्ये नियोजित वेळी मॉन्सून दाखल झाला असून, त्यानंतर जिल्ह्यात पावसाने जोरदार बरसात केली. त्यामुळे जिल्ह्यातील धरण समूहात सध्या 53 टक्के पाणीसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 60.91 टक्के साठा आहे. भोजापूर धरण 100 टक्के भरले आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ व इगतपुरी तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नेंद झाली आहे.

दहा तालुके टँकरमुक्त

जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधारेमुळे टँँकरच्या संख्येत घट होऊन अवघे 19 टँकर जिल्ह्यात सुरू आहेत. जिल्ह्यातील दहा तालुके टँंकरमुक्त झाले आहेत. सध्या बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला या तालुक्यांत टॅँकर सुरू आहेत. पाच तालुक्यांतील 87 गावांतील 41,870 लोकसंख्येसाठी 19 टँंकरच्या माध्यमातून 42 टँकरफेर्‍या सुरू आहेत.

शहरात 3 मिलिमीटर पाऊस

शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. गुरुवारी (दि. 3) दुपारी शहरात जोरदार पाऊस झाला. या पावसाची 3 मिलिमीटर नोंद झाली. पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

विविध धरणांतून विसर्ग
दारणा                        2,690
गंगापूर                      3,716
नांदूरमध्यमेश्वर         12,620
पालखेड                      1,500
भोजापूर                      70

Gavkari Admin

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

5 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

5 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

5 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

5 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

5 hours ago

साद देती सह्याद्रीशिखरे!

गड-किल्ले, डोंगरदर्‍या चढून तिथल्या निसर्गसौंदर्याने भारावून जाणे आणि इतिहासाची माहिती घेणे असा दुहेरी आनंद मिळतो…

5 hours ago