मनमाड : प्रतिनिधी
पानेवाडी गावाजवळ इंधनाचा एक टँकर नाल्यात उलटल्यामुळे हजारो लीटर इंधन रस्त्याने वाहू लागले. ही घटना नागरिकांना कळताच काहीनी मिळेल त्या भांड्यांमध्ये हे इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पानेवाडी गावाजवळ आज दुपारी इंधनाने भरलेला टँकर एम.एच.19 झेड- 9988 हा टँकर नाल्यामध्ये उलटला. टँकर इंधनाने भरलेला असल्यामुळे सर्व इंधन रस्त्यावर सांडले. रस्त्याने इंधन वाहू लागले. त्यामुळे नागरिकांनीही ड्रम, पातेले घेऊन येत इंधन भरुन नेले. ही घटना कंपनीला कळाल्यानंतर तातडीने कंपनीचे अधिकारी, कर्मचारी क्रेन आणि फोम बाटल्या घेऊन आल्याने पुढील अनर्थ टळला. नवीन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे खडीचे गंज पसरलेले आहेत. त्यामुळे टँकर उलटल्याचे सांगण्यात येते.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…