नाशिक: प्रतिनिधी
भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष योगेश बर्डे याची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव यांनी याबाबत पत्र दिले आहे, बर्डे यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघातील उमेदवार भारती पवार यांच्या वर आरोप।करून त्यांना चांगलेच अडचणीत आणले होते, त्यामुळे योगेश बर्डे यांची ही कृती पक्ष शिस्तीचा भंग करणारे असल्याने पक्षाने तातडीने गंभीर पाऊले उचलत त्यांची भाजपातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.