खंडणीच्या पैशावरून वाद; नाशिकरोडला पाच जणांकडून कुटुंबाला बेदम मारहाण

सिडको : प्रतिनिधी
चार दिवसांपूर्वी मागितलेली एक लाख रुपयांची खंडणी न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला मारहाण केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या बहिणीच्या पायालाही दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश बलभीम वीर बम (वय 30, रा. तुलसीबाग अपार्टमेंट, एकलहरे रोड, सिन्नरफाटा, नाशिकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. सुनील संपत कांबळे, तेजस कांबळे, मनीषा कांबळे, मिला गांगुर्डे आणि सिद्धार्थ गांगुर्डे अशी संशयितांची नावे आहेत.
दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास तुलसीबाग अपार्टमेंटमधील लिफ्टजवळ सुनील कांबळे याने चार दिवसांपूर्वी मुकेश यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, त्यांनी पैसे दिले नसल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर पत्नी आणि इतरांसह फिर्यादींच्या पत्नी, बहीण व वहिनी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी फिर्यादींच्या बहिणीच्या डाव्या पायाच्या पंजावर लाकडी दांड्याने मारून तिला जखमी करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास मुकेश हे इमारतीच्या पार्किंगमध्ये गेले. त्यावेळी सुनील कांबळे याने हातातील लोखंडी हत्याराने त्यांच्या नाकावर वार केला. तेजस कांबळे याने लोखंडी कोयत्याच्या उलट्या बाजूने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. तसेच मनीषा कांबळे, मिला गांगुर्डे आणि सिद्धार्थ गांगुर्डे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे तपास करीत आहेत.

Dispute over extortion money; family brutally assaulted by five individuals in Nashik Road

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *