नाशिक

जिल्हाभरात 44 हजार 216 साड्यांचे वाटप

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साडी वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, उशिराने साड्या पोहोचल्याने 14 एप्रिलनंतर त्यांंचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील जिल्ह्यात 44 हजार 216 साड्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील सुमारे एक लाख 76 हजार 924 पात्र महिला शिधापत्रिकाधारकांना साड्या वाटप करण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार प्रतिकुटुंंब एक साडी देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना सणानिमित्त साडी-चोळी वाटप करण्याची पद्धत महायुती सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. रेशन दुकानांमार्फत प्रत्येक लाभार्थी कुटुंबास साड्यांचे वितरण करण्यात येत आहे. धाविअ मालेगाव व कळवण, येवला, सिन्नर तालुक्यात अद्याप साड्यांचे वितरण नाही. अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबीयांना साड्या वाटपाला पंधरा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. अद्याप, धाविअ मालेगाव, कळवण व येवला, सिन्नर या ठिकाणी एकाही साडीचे वितरण झालेले नाही. तांत्रिक अडचणींमुळे वितरण होऊ शकले नसल्याची माहिती आहे.

अंत्योदय लाभार्थी
तालुका लाभार्थी वितरण
बागलाण  – 13,248 9,869
चांदवड –  6,416 2,690
देवळा –  5,060 496
दिंडोरी  – 13,127 10,635
धाविअ नाशिक –  10,606 8,159
धाविअ मालेगाव –  16,597 000
इगतपुरी  – 10,778 003
कळवण –  8,617 000
मालेगाव  – 11,276 1,051
नांदगाव  – 8,748 2,210
नाशिक  – 8,580 0005
निफाड  – 10,786 1,593
पेठ  – 10,782 0031
सिन्नर –  8,228 000
सुरगाणा  – 15,288 7,471
त्र्यंबकेश्वर –  8,818 003
येवला  – 10,009 000
एकूण  – 1,76,924 44,216

Gavkari Admin

Recent Posts

चोरी झालेली बाइक सापडली

शिलापूर : नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने चोरी झालेली मोटारसायकल जुन्या जनरल तिकीट घराजवळ मिळून…

7 hours ago

सर्व्हर डाऊनमुळे इंधन पुरवठा ठप्प; वेबसाइट हॅकची चर्चा

वाहनधारकांची गैरसोय होण्याची शक्यता, तांत्रिक दुरुस्तीचे प्रयत्न सुरू मनमाड : प्रतिनिधी मनमाडच्या पानेवाडीत असलेल्या हिंदुस्थान…

7 hours ago

पिंपरखेडला बोगस डॉक्टरला अटक

नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल, औषधसाठा जप्त पळाशी : वार्ताहर अ‍ॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना जनतेच्या…

7 hours ago

गोंदेजवळ आयशरची कारला धडक; 5 म्हशी ठार

सिन्नर : प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर नागपूर येथून देवनार-मुंबईकडे 21 म्हशी घेऊन जाणार्‍या आयशरने डाव्या…

7 hours ago

दिंडोरी, सुरगाण्यात अवकाळी पावसाचा कहर

वीजपुरवठा खंडित, घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान; भरपाईची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा,…

8 hours ago

एरंडगाव शिवारात युवकाचा मृत्यू

येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव…

8 hours ago