नाशिक : प्रतिनिधी
राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात यंदा लवकर मॉन्सून दाखल झाला आहे. पावसाळ्यात आपत्तीच्या अनेक घटना घडतात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून, त्यादृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत.
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील 49 गावांत भूस्खलन, तर किमान पाच गावांत महापुराचा धोका लक्षात घेता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून आपत्ती निवारणासाठी दक्षता घेण्यात येणार आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज असून, मे महिन्यातच इतका पाऊस झाल्याने जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत काय परिस्थिती असेल, त्याचा अंदाज बांधणेदेखील मुश्कील झाले आहे. यंदा आपत्कालीन विभागाच्या यंत्रणेवर व्यवस्थेचा ताण येण्याची शक्यता गृहीत धरून सर्व उपकरणांची सज्जता करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील या गावांना धोका
पावसाळ्यात सर्वाधिक धोका हा अर्थातच गोदाकाठच्या गावांनाच अधिक प्रमाणात असतो.
त्यातही सायखेडा, निफाड, चांदोरी या गावांना सर्वाधिक धोका असतो.
त्यादृष्टीने सर्व सज्जता ठेवली जात आहे. त्याशिवाय,
आपत्कालीन परिस्थितीसाठी भोजन, औषधोपचार,
स्वच्छतागृहांची सोय, जनावरांसाठी चारा, आपत्ती
व्यवस्थापनातील बचावाचे साहित्य यांची तयारी केली जात आहे.
काही जागांबाबत सर्वेक्षण
काही ठिकाणे ही वन विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे
आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या ठिकाणांचा विषय
संबंधित तहसीलदार व वन विभागाकडे सुपूर्द केला.
या विभागाने गेल्या वर्षी 49 गावांचा, तर यावर्षी कानडवाडी,
तळेगाव व पिंपळगाव भटाटा (सर्व ता. इगतपुरी),
सुरगाणा शहर व अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) या पाच ठिकाणांचे
प्रस्ताव जिऑलॉजिकल सर्वेक्षणासाठी पाठविले आहेत.
49 गावांना भूस्खलनाचा धोका
तालुका व गावपातळीवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला
प्राप्त माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, कळवण, नाशिक व
सिन्नर येथे एकूण 49 धोकादायक ठिकाणे असल्याचे सांगण्यात आले.
बहुतांश ठिकाणी तर लोकवस्तीच नाही. त्यामुळे येथे
उपाययोजनेची आवश्यकता नसल्याचा अंदाज सार्वजनिक
बांधकाम विभागाने वर्तविला आहे.
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…
शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…
फेसबुक तरुणीच्या बोलण्याला भाळला अन दोन कोटी गमावून बसला शहापूर : साजिद शेख एका…
अलिशान वाहनातून गुटख्याची तस्करी करणारा गजाआड दोघांवर गुन्हा, 11 लाख रुपयांचा ऐवज वाहनासह जप्त दिंडोरी…
उज्ज्वल निकम होणार खासदार नाशिक: प्रतिनिधी 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यात महत्वपूर्ण कामगिरी…