महाराष्ट्र

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी
प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

सद्या प्रेमाची व्याख्याच बदलून गेली आहे. निस्सीम प्रेम, एकनिष्ठ या गोष्टी म्हणजे अळवावरचे पाणी झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या घटनेने तर प्रेमावरचा विश्वासच उडेल, असा सारा मामला. त्याचे झाले असे की, धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणीचे गावातीलच योगेश काळे नावाच्या तरुणाशी प्रेम संबध होते. जिना मरना तेरे संग म्हणत आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यामुळे दोघांचा साखरपुडाही झाला. पण साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी योगेशच्या वाग्दत्त वधुने योगेशबरोबर बोलणे टाळत योगेशच्या मित्राबरोबरच सूत जुळविले.आणि विशेष म्हणजे लग्नही केले. प्रेमात धोका मिळालेल्या योगेशच्या मनाला ही बाब जिव्हारी लागली. त्याने व्हाटसअ‍ॅपवर प्रेमात धोका मिळाला असे स्टेटस ठेवले. ते सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर योगेशचे रोहित बागल, चेतन माने, सत्यवान चादरे यांनी अपहरण केले. जंगलात घेऊन जात त्याला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर धाराशिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

9 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

26 minutes ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

22 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

22 hours ago

समाजाची अधोगती…

गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…

22 hours ago

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक

सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…

22 hours ago