नाशिक

अंबड पोलीस ठाण्याचे लवकरच विभाजन-अंकुश शिंदे

उद्योजकांना भेडसवणाऱ्या विषयांवरून
निमातर्फे आयोजित सर्व यंत्रणांची बैठक गाजली

नाशिक: प्रतिनिधी

वाहतूक समस्या,अतिक्रमण,रस्त्यांच्या खोदकामामुळे उद्भवणाऱ्या समस्या तसेच अवैध धंद्याला आलेले उत यासह उद्योजकांना भेडसावणाऱ्या अनेक म्हत्वांच्या मुद्यांवरून निमा हाऊसमध्ये आयोजित बैठक गाजली.उद्योजकांच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष न देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी चांगलेच धारेवर धरले.दुहेरी फायरसेसचा प्रश्न मार्गी लागला असून 1 एप्रिलपासून त्याची अमलबजावणी होईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले तर अंबड पोलीस ठाण्याचे लवकरच विभाजन होऊन नवीन पोलीस ठाणे निर्माण होईल,असे सूतोवाच पोलीस आयुक्तांनी केले.
जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यास पालकमंत्रयांच्या सूचनेनुसार महापालिका,पोलीस,महसूल,एमआयडीसी,प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी निमा हाऊस येथे (सातपूर) येथे पार पडली. व्यासपीठावर महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे,निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,सचिव राजेंद्र अहिरे,महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कामगार उपायुक्त विकास माळी,अधीक्षक अभियंता एमआयडीसी बाळासाहेब झांज्जे,जिल्हा उदयोग केंद्र सहसंचालक शैलेंद्र राजपूत,विद्युत मंडळाचे माणिकलाल तपासे आदी होते.
प्रास्ताविक निमा अध्यक्ष बेळे यांनी केले बैठकीचा उद्देश स्पष्ट करतांनाच त्यांनी उधोजकांच्या विविध समस्यांना वाचा फोडली.
अंबड औद्योगिक वसाहतीतील दुहेरी फायरसेसचा प्रसन्न मार्गी लागल्याचे आणि एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.सीईपीटी करू.नीरीचा अहवाल आला असेल तर या मुद्यावर पुढे जाऊ अशी घोषणा महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी केली.सातपुरला शहरात गॅस पाईपलाईन जाळे होणार आहे.चुकीची कामे करू नका असे मोबाइल कंपन्यांना सांगितले आहे.तुमचे काम करतांना दुसऱ्या युटिलिटीला तडे नको असे त्यांना बजावले आहे.सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा.एलबीटीचे परतावे लवकर होतील, असेही ते म्हणाले.जाचक मालमत्ता कराबाबत बोलतांना इंडस्ट्रीयल स्लॅब करू असे आयुक्तांनी सांगितले.सांडपाण्याचा प्रकल्प अमृत-2 मधून घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले
चर्चेत मधुकर ब्राह्मणकर,जयप्रकाश जोशी,सतीश कोठारी,राजेंद्र फड,अतुल भदाणे, यतीन पटेल, संजय सोनवणे,मनीष रावल, बबन चौरे, नितीन आव्हाड, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, समीर पटवा, विनायक गोखले, आदींसह उपस्थित अनेक उद्योजकांनी चर्चेत सहभाग घेतला,
सुमारे दोन ते अडीच वर्षानंतर होत असलेल्या बैठकीच्या सूर बघता अनेक उद्योजकांनी ही प्रति झूम मीटिंगच झाल्याचे यावेळेस बोलून दाखवले,
वाहतूकप्रश्नांवर उपस्थितांनी प्रश्नांची सरबत्तीच केली.आयटीआय सिग्नल,एक्सलो पॉईन्टसह तीन ठिकाणी सातत्याने वाहतूक ठप्प होते.अवैध धंदे बंद व्हावेत, सातपूर व अंबोडा औद्योगिक वसाहती मधील अतिक्रमण त्वरित काढावे असे सांगितले असता
कुठलेही अनधिकृत अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही व ते तातडीने काढल्या जाईल, व टपऱ्या अनधिकृत असतील तर त्या उचलण्यास सांगितले जाईल.वाहतूक प्रश्नांवर तोडगा काढण्यास महापालिका आणि संबंधित यंत्रणांबराबर संयुक्त मोहीम घेतली जाईल.अंबड पोलीस स्टेशनच्या विभाजनाचा
प्रस्ताव शासनास पाठविला आहे.लवकरच नवीन पोलीस स्टेशन कार्यरत होईल असे सूतोवाच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी करताच सर्वानी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.सर्वानी नियम पाळल्यास वाहतूक समस्येला आळा घालणे शक्य होईल,असेही शिंदे पुढे म्हणाले.वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी वाहतुकदारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून महानगरात सद्या बंद असलेल्या सर्व जकात नाक्यांवर ट्रकटर्मिस उभारल्यास वाहतुकीला आळा बसू शकेल असे ते म्हणले.जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासाला तडा निर्माण करणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना बेळे यांनी चांगलेच खडसावले.आम्ही गुंतवणूक आणतो परंतु तुमच्या आडमुठ्या धोरणांमुळे तिला खीळ बसत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही बेळे यांनी दिला.नाशिक जिल्ह्यात एमआयडीसीसाठी 1100 एकर जागा उपलब्ध होऊ शकते,असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.उद्योजकांनी सीएसआर फंडातून विद्युत दहिन्या,कम्युनिटी टॉयलेट आणि वाहतूक बेट उभारण्यासाठी सहकार्य करवे अशी विनंती महापालिका आयुक्तांनी यावेळी केली.बैठकीस उद्योजक तसेच सर्व यंत्रणांचे अधिकारी व उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.
उपस्थित उद्योजकांमध्ये निमाचे उपाध्यक्ष किशोर राठी, निमाचे सचिव हर्षद ब्राह्मणकर श्री मिलिंद राजपूत,रवींद्र झोपे, संजय सोनवणे,श्रीधर व्यवहारे, जयंत जोगळेकर, मनीष रावल,सुधीर बडगुजर, आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे, हेमंत खोंड, आदींसह खूप मोठ्या संख्येने सुमारे 200 ते 250 उद्योजक उपस्थित होते

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

20 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago