युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघातात निधन
पंचवटीतील उड्डाण पुलावरील मध्यरात्रीची घटना…
पंचवटी : वार्ताहर
पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (३२) यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे एक उमदे युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी रात्री १२.१५ वाजता ही घटना घडली. मानस पगार हे सहकाऱ्यासमवेत पिंंपळगावकडे परतत होते. मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या मानस पगार यांचे प्राणोत्क्रमण झाले. तर सहकारी सूरज मोरे हा गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मानस पगार यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त समजताच राज्य व देशपातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांना या वृत्ताने धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या भारत जोडो यात्रेतही मानस पगार हिरीरीने सहभागी झाले होते. तसेच ते सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते .
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…