बजेट कोलमडले : नागरिकांचे निघणार दिवाळं
नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी हा नवचैतन्याचा सण आाहे.. दिवाळीच्या महिनाभर आधीपासून दिवाळीची तयारी करण्यात येते. अबालवृध्दापासून सगळ्यांनाच दिवाळीच्या सणाची उत्सुकता असते. दिवाळीत तयार केल्या जाणार्या फराळी पदार्थाची उत्सुकता असते. मात्र यंंदा दिवाळीतील फराळी पदार्थालाही महागाईचा फटका बसला आहे.
दिवाळी फराळासाठी लागणारे चकली, चिवडा ,लाडू, करंजी,शंकरपाळे पदार्थ केेले जातात. मात्र किराणाच्या दरात वाढ झाल्याने तयार फराळी पदार्थाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा खुमासदार फराळ खाण्यासाठी महागाईचा झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत.
पूर्वी दिवाळी फराळ बनवण्यासाठी घरातील सर्व महिला वर्ग एकत्र येत तयारी करत असत. आणि हितगुज साधत दिवाळी फराळाचे पदार्थ बनवत असत. पण काळ बदलला तसा महिलांही नोकरी करत असल्याने त्यांना ड्यूटीमुळे फराळ घरी बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात तयार फराळी पदार्थांना मागणी वाढली आहे. तयार फराळी पदार्थांना वाढलेली मागणी लक्षात घेत अनेक बचत गटांकडून घरगुती फराळ विक्रीसाठी ठेवला आहे. यंदाही घरगुतीपध्द्ीने बनवलेल्या फराळी पदार्थाना मागणी वाढली आहे.
तयार फराळी पदार्थ 1 कि. किंमत
चकली 320
भाजके पोहे चिवडा 300
करंजी 600
अनारसे 600
बेेसन लाडू 600
गोड शंकरपाळे 350
तिखट शंकरपाळे 320
अनारसे पीठ 220
हेही वाचा : शिधापत्रिकाधारकांना सरकारचं दिवाळी पॅकेज
यंदा खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने तयार फराळच्या किंमतीही 30 टक्कयांनी वाढल्या आहेत. किंमती वाढल्या असल्या तरी यंदा ग्राहकांची तयारी फराळी पदार्थांना मागणी अधिक आहे.
वैशाली गोसावी,( घरगुती फराळी पदार्थाचे व्यावसायिक )
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…