आरोग्यदायी दिवा

आपण सर्वजण घरामधील मंदिरात, तुळशीजवळ दिवा लावतो, कारण दिवा लावल्याने तन व मन प्रसन्न होते. भक्ती बरोबर शक्तीही मिळते, तर ही शक्ती म्हणजे त्या दिव्यामधून येणारा सुगंध.. आपणास माहीत असेल की त्या सुगंधाने आपल्याला निरोगीसुद्धा राहता येऊ शकते.
दिवा कशाचा लावला तर त्याने वातावरण शुद्ध होते व आरोग्य कसे चांगले होते किंवा आजारपणात ते कसे फलदायी ठरतात हे पाहूया. दिवा छोटा व मातीचा असणे आवश्यक.
शुद्ध तुपाच्या दिव्यात एक कापूर वडी व एक लवंग टाकल्यास, सतत होणारी सर्दी व डोकेदुखी बरी होण्यास मदत होते. दिवसातून केवळ एकवेळेस.

शुद्ध तुपाच्या दिव्यात एक कापूर व एक काळेमिरी टाकल्यास, मानसिक आजार, हातापायात येणारी सूज कमी होण्यास मदत होते. मोहरीच्या तेलाच्या दिव्यात हिंग व लवंग टाकल्यास, अंगात होणारी जळजळ, ऍसिडिटी, मळमळ, डोकं जड होणे, जुलाब होणे हे विकार थांबण्यास मदत होते.
मोगर्‍याचे तेला(चमेली तेल) मध्ये दोन थेंब दुधाचे टाकल्यास, सतत होणारी बेचैनी, अंगदुखी, मणक्याचा त्रास, मान अवघडणे हे त्रास बरे होण्यास मदत होते.

सूर्यफुलाच्या तेलाच्या दिव्यात एक कडुनिंबाचे एक पान टाकल्यास कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. शुद्ध तुपाच्या दिव्यात भीमसेन कापूर व ओवा टाकल्यास हवेतील बारीक कीटक जे दिसत नाहीत ते राहत नाही व ऑक्सिजनचे प्रमाण सामान्यत: वाढण्यास मदत होते.

 

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *