राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या

युद्धाचा परिणाम ः दरात 60 रुपयांची वाढ; नवे दर लागू

नवी दिल्ली :
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. 7 मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 115 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. एप्रिल 2025 नंतर पहिल्यांदाच गॅसच्या किमतीत इतकी मोठी वाढ झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या गॅसच्या किमती अचानक वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. दिल्लीप्रमाणेच मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्येही किमतीत वाढ झाली आहे. स्थानिक टॅक्सनुसार ही किंमत थोडीफार वेगळी असू शकते. केवळ घरगुतीच नाही, तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या खाद्य विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. परिणामी बाहेरचे खाणेही महाग होऊ शकते. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल 8 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला होता, तेव्हा किंमत 50 रुपयांनी वाढवण्यात आली होती.

व्यावसायिक गॅस किमतीतही वाढ

सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे. याचा सर्वांत मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर आहे.

Domestic gas cylinder prices soar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago