डॉ.अद्वय हिरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी निवड
मालेगाव: प्रतिनिधी
डॉ.अद्वय हिरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली. पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे माहिती दिली. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून अद्वय हिरे यांचे संघटन कौशल्य शिवसेना वाढीसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
डॉ.अद्वय हिरे यांच्या शिवसेना प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. यातच त्यांची उपनेतेपदी निवड करण्यात आल्याने उत्साह वाढला आहे. येत्या २६ तारखेला मालेगावच्या कॉलेज ग्राऊंडवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी डॉ. हिरे यांनी मुंबई येथे मातोश्री वर जाऊन ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले.
याप्रसंगी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, माजीमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते आंबदास दानवे, आमदार भास्करराव जाधव, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहनेते सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, सुरेश पवार, पवन ठाकरे आदी उपस्थित होते.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…