डॉ. शेफाली भुजबळांनी कांद्याच्या शेतात केली निंदणी

डॉ. शेफाली भुजबळांनी कांद्याच्या शेतात केली निंदणी

नांदगाव मतदारसंघाच्या पंचक्रोशीत जोरदार चर्चा

नांदगाव: प्रतिनिधी

नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ यांनी कांद्याच्या शेतात जाऊन निंदणीचे काम केले. यावेळी त्यांनी शेतमजूर महिलांशी संवाद साधला. त्यामुळे ही बाब पंचक्रोशीत जोरदार चर्चेची ठरली.
मुळडोंगरी, जामदरी तांडा, काळमदरी, गिरणारे, मळगाव, बोराळे येथील तसेच विविध ठिकाणी शेतामध्ये मोलमजुरी काम करणाऱ्या महिला व पुरुष मतदार वर्गाशी डॉ. शेफली भुजबळ यांनी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एका शेतात कांदा निंदणीचे काम चालू होते. यावेळी डॉ. भुजबळ यांनी प्रत्यक्ष कांदा निंदणीचा अनुभव घेत उपस्थित महिलांना चकीत केले. कांदा लागवड ते काढणी, साठवण आदी प्रक्रिया त्यांनी यावेळी जाणून घेतली. महिलांनीही त्यांना उत्स्फुर्तपणे माहिती दिली. कांदा हे या भागातील मुख्य पीक झाल्याने कांद्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याबाबत डॉ. भुजबळ यांनी महिलांना आश्वस्त केले.
यावेळी अशोक तेलहूरे, अमित पाटील, शेखर पगार, भारत राठोड, आबासाहेब इनामदार, सखाराम चव्हाण, संगा चव्हाण, निलेश इनामदार, देविदास पगार, देवदत्त सोनवणे आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणार

महिला बचतगटांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. त्यांना आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच, कौशल्य प्रशिक्षणाद्वारे महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही डॉ. शेफाली भुजबळ यांनी दिली. नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मा. खा. समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्या बोलत होत्या. डॉ. भुजबळ यांनी निमगाव गटातील येसगाव बु., येसगाव खु., मथुरपाडे, अजंदे, खायदे, खायदेवाडी, गिलाणे व निमगुळे येथील महिला व पुरुष मतदार वर्गाशी संवाद साधला. त्यांच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या.

गावागावातील महिलांना कायमस्वरूपी भेडसावत असलेली पाण्याची समस्या, शाळांची दुरवस्था, गावांमध्ये महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उपलब्ध नसल्याची खंत यावेळी महिलांनी बोलून दाखवली. यावेळी गावचे आजी- माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगावचा नारा यावेळी उपस्थितांनी दिला. तसेच येत्या २० नोव्हेंबरला मतदान यंत्रावरील शिट्टी ही निशाणी समोरील बटण दाबून समीर भुजबळ यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निश्चय सर्वांनी केला.

यावेळी सौ. अलकाताई शिंदे, दगडू शिंदे, सुभाष सोनवणे, दीपक शिंदे, सुनीता पवार, अड. ज्ञानेश्वर शेलार, जयश्री माळी, पंकज दुडे, रविंद्र धवडे, विजय दुडे, सोमनाथ शेलार, संतोष जाधव, साकरचंद, अमोल राजकुवर, शांतीलाल आबा, विशाल कदम, गोकुळ बाबा, सौ. कुसुमताई कफम, शशी भाऊ बागुल, नितीन शेलार, दत्तू शेवाळे, मनोज अहिरे, संदीप बोरसे, योगिता अहिरे, प्रतिभा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

19 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

19 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

20 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

20 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

20 hours ago