नाशिक

दुष्काळाने त्र्यंबकनगरीवर पाणीकपातीचे सावट

बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने त्र्यंबकेश्वर परिसरातील जलप्रवाह शुष्क झाले आहेत. शासकीय आदेशानुसार त्र्यंबकेश्वर नगर परिषद पुढील काही दिवसांत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करत आहे. एकीकडे नागरिकांवर पाणीकपातीची टांगती तलवार असताना, दुसरीकडे शहर व परिसरात सुरू असलेल्या बांधकामांसाठी धरणातील व तलावांतील पाण्याचा वारेमाप वापर केला जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गोदावरीच्या उगमस्थानी वसलेले त्र्यंबकवासीय गेल्या 25 वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठ्याने त्रस्त आहेत. दररोज अवघा 30 मिनिटे मिळणारा पाणीपुरवठा वीज खंडित होणे किंवा वाहिनी
फुटण्यामुळे वारंवार ठप्प होतो. सधन नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि लॉजिंगचालक कूपनलिका,
स्वतःचे टँकर अथवा मिनरल वॉटर जार विकत घेऊन गरज भागवतात; परंतु सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
बळीराजा दुष्काळाने होरपळत असताना आणि सर्वसामान्यांना पिण्याचे पाणी मिळत नसताना, बांधकामांवर पाणी उधळणे अयोग्य आहे. त्यामुळे शासन, लोकप्रतिनिधी आणि साधू-महंतांनी पुढाकार घेऊन यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा केवळ आवश्यक धार्मिक विधींपुरता मर्यादित व साधेपणाने साजरा करावा, तसेच पाऊस समाधानकारक होईपर्यंत भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन सुजाण नागरिकांमधून केले जात आहे.

कुंभमेळा साधेपणाने साजरा करा

1 नोव्हेंबरपासून सिंहस्थ पर्वकाल सुरू होत असून, भाविकांची गर्दी वाढणार आहे. अशा वेळी 48 ते 72 तासांतून एकदाच मिळणारे पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. भाविकांच्या पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी आणि अंघोळीसाठी लागणार्‍या पाण्याच्या व्यवस्थापनाचा प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र आहे.

Drought casts a shadow of water rationing over the city of Trimbak

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

25 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

29 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

41 minutes ago