गोदाघाट परिसरात मद्यधुंद चालकाचा थरार कार थेट गोदावरी पात्रात घुसवली

पंचवटी : प्रतिनिधी
शहरातील पंचवटी परिसरातील गोदाघाट परिसरात एका मद्यधुंद कारचालकाचा अंगावर काटा आणणारा थरार पाहायला मिळाला. टाळकुटेश्वर मंदिराच्या अलीकडच्या बाजूला असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात या चालकाने आपली चारचाकी गाडी थेट आत घुसवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.26) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मारुती कंपनीच्या (एमएच 15 केयू 7958) या गाडीवरील चालक प्रचंड दारूच्या नशेत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट नदीपात्रात जाऊन घुसली. सुदैवाने नदीत पाणी कमी असल्याने आणि आजूबाजूला नागरिक असल्याने मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने नेटकर्‍यांकडून मद्यपी चालकावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नदीपात्र परिसरात भाविक आणि नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, अपघात झाला त्या वेळी परिसरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने वाहन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

Drunk driver’s car plunges into Godavari river in Godaghat area

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *