बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट

नाशिक बाजार समितीच्या आवाहनाला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंचवटी : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बाजार समितीतील दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवार व पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डातील सर्व व्यवहार गुरुवारी (दि.29) पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. यामुळे बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. मध्यरात्री बारा वाजेनंतर बाजार समिती खुली होणार असून, सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात
आली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शहरासह नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, दुगाव, दिंडोरी, ढकांबे, पिंपळनेर, आशेवाडी, आक्राळे, वरवंडी, आंबे, शिवनई, ओझर, सय्यदपिंप्री, सिन्नर, शिंदे, ब्राह्मणगाव, वाडीवर्‍हे तसेच नगर व धुळे जिल्ह्यांतूनदेखील पालेभाज्या व फळभाज्यांची आवक होते. त्र्यंबक, हरसूल या ठिकाणी साळीची आवक होते. यावर बाजार समिती अडते व व्यापारी खरेदी केलेला शेतीमाल हा मुंबई व उपनगरे तसेच गुजरात राज्यातील सुरत, वापी, अहमदाबाद, बडोदा व दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पाठविला जातो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवार व पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बुधवारी (दि. 28) रात्री 12 वाजेपासून ते गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. या कालावधीत शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये, असे आवाहन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनातर्फे करण्यात आले होते. त्याला जिल्हाभरातील सर्व शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गुरुवारी (दि.29) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवार व पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात शुकशुकाट दिसून आला. मात्र, मध्यरात्री 12 वाजेनंतर सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होणार असून, शुक्रवारी (दि. 30) नियमित वेळेनुसार व्यवहार पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही बाजार समिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Dry conditions in the market committee premises

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *