फेब्रुवारी महिना सुरू झालाय.आता वातावरणात गरमी जाणवायला लागलीये. संक्रांत झाली की तिळातिळाने दिवस वाढतो व रात्र लहान होते. आणि साधारणतः होळी पौर्णिमेनंतर आपल्याला उकडा जाणवायला लागतो. हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि मोठेपणी अनुभवतोय बरोबर ना. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यावर एक लगबग असते ती म्हणजे उन्हाळी वाळवणाची. फेब्रुवारी,मार्च, एप्रिल या तीन महिन्यात प्रामुख्याने ऊन कडक असल्याने या कडक उन्हात वाळवण्याचे पदार्थ जसे की, वडे, पापड कुरडया हे कडक वाळतात व वर्षभर टिकतात. उन्हाळी वाळवण ही एक केवळ प्रक्रिया नसून भारतीय संस्कृतीतील जिवंत परंपरा आहे. या कडक उन्हाचा वापर करून कुरडई, वडे,पापड, सांडगे यासारखे पदार्थ वर्षभरासाठी केले जातात. त्याचप्रमाणे बटाट्याचे वेफर्स, साबूदाणा चकली यासारखे पदार्थ तसेच मसाले यांचाही समावेश यामध्ये होतो. याद्वारे शेजारी पाजरी एकत्र येऊन काम करतात ज्याद्वारे नात्यांमधील गोडवा वाढतो. तसेच हा काळ लहान मुलांच्या सुट्टीचा असल्याने त्यांच्यासाठी धमाल, मस्ती आनंद असतो. हे उन्हाळी वाळवणातील काही महत्त्वाचे पैलू सांगता येतील.
घरातील पुरुष मंडळी ऑफिसला गेली की या प्रक्रियेला सुरुवात करायची व संध्याकाळी परत यायच्या आधी ही प्रोसिजर पूर्ण करायची असे साधारणतः घरातील गृहिणीचे नियोजन असते. एवढ्या प्रेमाने, कष्टाने व हौशीने केलेले पदार्थ जेव्हा घरचे खातात आणि त्यांच्या चेहर्यावरील समाधान व पदार्थ आवडल्याचा आनंद पाहून गृहिणीला दिलासा मिळतो. आणि ती समाधानाचा सुस्कारा सोडते. इतकी साधी, सोपी भावनापूर्ण ही वाळवणाची संस्कृती आहे. आजच्या धावपळीच्या काळातही ही वाळवणाची परंपरा चव आणि टिकाऊ पणा जपत आहे जी आपल्याला आपल्या मुळाशी कायम जोडून ठेवते हे जास्त महत्त्वाचे आहे..
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…