नाशिक

प्रतिकूलतेमुळे द्राक्षाला 200 रुपये किलोचा भाव

यंदा उशिरा द्राक्ष हंगामाला सुरुवात; परतीच्या पावसामुळे 70 टक्के नुकसान

निफाड : आनंदा जाधव
दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होणारा द्राक्ष हंगाम यंदा तब्बल दीड महिने उशिरा आणि धीम्या गतीने सुरू होत आहे. हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला 201 रुपये प्रतिकिलोने भाव मिळाला आहे. यंदा दीर्घकाळ लांबलेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने तालुक्यात जवळपास 70 टक्के द्राक्षबागांना फळधारणा झाली नसल्याने त्याचा थेट परिणाम बाजारभाव वाढण्यावर झाला. द्राक्ष पिकासाठी झालेला खर्च आणि अल्प उत्पादन यामुळे यंदा द्राक्षपीक तोट्याचे ठरण्याची अधिक शक्यता आहे.
द्राक्षपंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख आहे.. वेगवेगळ्या जातीची निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्याची येथून शेतकर्‍याची खासियत आहे. मात्र, यंदा निसर्गाने त्यावर अक्षरश: पाणी फिरविले. वर्षातून एकदाच येणार्‍या या पिकासाठी शेतकरी मेहनत घेतो. मात्र, यंदा परतीचा दीर्घकाळ लांबलेल्या पावसामुळे बागेत औषध फवारणीस अडचणी आल्या. बागेत पावसाचे पाणी साचून राहिल्याने द्राक्षवेलींच्या मुळ्या चोकअप होऊन वेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता कमी झाली. प्रतिकूल हवामानाचीदेखील त्यात भर पडली.
तालुक्यात थॉमसन, शरद सीडलेस, अनुष्का, एसएसएन या द्राक्ष वाणांची सर्वाधिक लागवड झालेली असून, त्यांना भावदेखील चांगला मिळतो. हंगामाच्या प्रारंभी व्यापारीवर्ग साधारण 150 ते 200 रुपये प्रतिकिलोप्रमाणे द्राक्ष खरेदी करतात. द्राक्षमालाची आवक आणि टंचाई यावर बाजारभावाचे गणित अवलंबून असते.
यंदा अतिपावसामुळे 70 टक्के द्राक्षबागांना फलधारणा न झाल्याने यापैकी अनेक शेतकर्‍यांनी द्राक्षबागा तोडल्या. त्यामुळे यावर्षी बेदाणा, मनुके, द्राक्षमणीदेखील भाव खातील, असा अंदाज आहे. जमतेम द्राक्षमालामुळे यंदा द्राक्षाला सुरुवातीला मिळणारा बाजारभाव शेवटपर्यंत राहील किंवा या बाजारभावात वाढ होईल, असाच अंदाज आहे.
साहजिकच आजचा बाजारभाव जास्त वाटत असला तरी त्या तुलनेत फळधारणा झालेली नसल्याने जमा-खर्चाची तोडमिळवणी करताना शेतकर्‍यांच्या नाकीनऊ येणार हे मात्र निश्चित. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने शेती व्यवसायाला प्राधान्य देत, ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शरद सीडलेस जातीची बाग असून, दरवर्षी मी ऑगस्ट महिन्यात द्राक्षबागेची छाटणी करीत असतो. यंदा अतिपावसामुळे 1 सप्टेंबरला छाटणी केली. आता आठ दिवसांपासून मोहाडी येथील गुरुकृपा एक्स्पोर्टला 190 रुपये किलोप्रमाणे द्राक्ष दिली. प्रतिकूल परिस्थितीत द्राक्षबाग वाचविल्याने यंदा चांगले उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. यानंतर दुसरा प्लॉटदेखील सुरू करणार आहे.
– विजय डांगले, प्रगतिशील शेतकरी, नांदूरमध्यमेश्वर

Due to adverse conditions, the price of grapes is Rs 200 per kg.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago