नाशिक

बंडखोरांसह अपक्षांचे पक्षीय उमेदवारांना आव्हान

मतविभाजनाचा फटका बसण्याची भीती

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेनेसह ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी करत काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांना घाम फोडल्याचे चित्र आहे. 15 जानेवारी रोजी नाशिक महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने पक्षातील अधिकृत उमेदवारांसह अपक्ष असे एकूण 1390 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात अपक्षांची संख्या चक्क 940 एवढी आहे.
भाजप व शिंदेसेना, राष्ट्रवादीची युती मनपा निवडणुकीत तुटली असून, भाजप एकटी स्वबळावर लढत आहे. तर शिंदेसेना व राष्ट्रवादीने युती करत भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. भाजपसह शिंदेसेना सत्तेत असल्याने साहजिकच त्यांच्याकडे सुरुवातीपासून इच्छुकांची मोठी गर्दी होती. मात्र, ठाकरे गटाकडेही मुलाखत देणार्‍यांची संख्या मोठी होती. दरम्यान, पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या अनेक इच्छुकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. काही हौशी उमेदवारांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परिणामी, प्रमुख राजकीय पक्षांची डोकेदुखी कायम असल्याचे चित्र आहे. 2017 मध्ये नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर 2022 मध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आली. कोरोना महामारीमुळे व ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. 2022 मध्ये होणारी निवडणूक 2026 मध्ये होत आहे. या निवडणुकीमुळे शिंदे गटाची शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मनसे तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या प्रमुख पक्षांमध्ये निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले. विशेषतः शिंदेसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. महायुतीतील जागावाटपात कमी-अधिक जागा मिळाल्याने पक्षश्रेष्ठींना सर्व इच्छुकांना न्याय देता आला नाही. परिणामी, अनेक निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणार्‍या इच्छुकांना डावलल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. या बंडखोरीला आळा घालण्यासाठी महायुती आणि आघाडीतील नेत्यांनी कंबर कसली. काही ठिकाणी माघार घेण्यात यश मिळाल्याचा दावा केला जात आहे.

Rebels and independents challenge party candidates

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago