निर्यातशुल्कमुळे जगभरातून भारतीय कांद्याकडे पाठ
लासलगाव:-समीर पठाण
निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधील असंतोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी मागे घेण्याची घोषणा केली असली तरी विविध अटींमुळे कांदा निर्यातीवर एकत्रित ९० टक्के शुल्क अजूनही लागू आहे.या उच्च शुल्क मूल्यामुळे भारतीय कांद्याचे दर परदेशात ७० ते ७५ रुपये पर्यंत जात असल्याने या दराने कांदा खरेदी करणाऱ्या विदेशी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवल्याचे जाहीर केले परंतु कांद्याच्या निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य डॉलर ५५० प्रति टन आणि ४० टक्के निर्यात शुल्क कायम ठेवण्यात आले आहे.कांदा एक जीवनावश्यक वस्तू,प्रचंड निर्यात शुल्क असलेला एकमेव खाद्यपदार्थ बनला आहे.जवळपास पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही कांदा निर्यातबंदी कायम आहे.किमान निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क यामुळे भारतीय कांद्याचे निर्यात शुल्क 64 रुपये प्रति किलोवर जात आहे.निर्यातीचा खर्च पाहता, भारतीय कांदा जेव्हा संबंधित देशात पोहोचतो तेव्हा त्याची किंमत ७० ते ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत असते.या दराने भारतीय कांदा कोणीही खरेदी करत नसल्याची खंत निर्यातदारांनी व्यक्त केली.
२०२२-२३ मध्ये भारतातून कांद्याची आर्थिक निर्यात २.५ लाख मेट्रिक टन होती.चीननंतर भारत हा सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे आणि कांद्याच्या उत्पादनात १५% वाटा आहे. २०१८ ते २०२३ या सहा वर्षांत कांद्याने भारताला ०९ अब्ज डॉलर्स आणि ७२० अब्ज डॉलर्सचे स्वतंत्र परकीय चलन प्रदान केले.२०२३-२४ मध्ये भारत हा कांदा निर्यातीत पहिल्या क्रमांकावर होता.
आखाती देशात भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे. मात्र गेल्या डिसेंबरपासून भारतीय कांदा तेथे पोहोचू शकला नाही. सध्या इजिप्त, पाकिस्तान, तुर्की, चीन आणि मोरोक्कोसह काही आफ्रिकन देशांतून कांद्याची निर्यात होत आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला यंदा मोठी बाजारपेठ गमवावी लागली आहे. गडद लाल, हलका लाल, पांढरा, गुलाब, पुसा रत्नार, पुसा लाल, पुसा पांढरा गोल या जातींना मोठी मागणी आहे. आखाती देशांमध्ये बिर्याणी आणि इतर मांसाहारी पदार्थ भारतीय कांद्याच्या पेस्टशिवाय तयार होत नाही
गेल्या सहा वर्षांत कांदा निर्यातीतून मिळालेले परकीय चलन
२०१८: १.४ अब्ज डॉलर
२०१९: १.२ अब्ज डॉलर
२०२०: १.८ अब्ज डॉलर
२०२१: १.६ अब्ज डॉलर
२०२२: १.३ अब्ज डॉलर
२०२३: १.७ अब्ज डॉलर
2023-24 मध्ये भारतातून निर्यात :
-एकूण निर्यात : आठ लाख १९ हजार ७७४
-एकूण निर्यातदार कंपन्या : १४,००४
-एकूण खरेदीदार कंपन्या: ३१,०७५
-प्रमुख आयातदार देश: श्रीलंका, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती
भारतीय कांद्याचे प्रमुख ग्राहक देश :
बांगलादेश ३०.२६ टक्के
मलेशिया १८.४८ टक्के
युएई १३.२४ टक्के
श्रीलंका १२.५५ टक्के
नेपाळ ६.६ टक्के
इंडोनेशिया ४.५१ टक्के
सौदी अरेबिया ४.०२ टक्के
कतार ३.७४ टक्के
कुवेत ३.३५ टक्के
ओमन ३.२५ टक्के
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…